मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दाखल केलेल्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा दिला आहे. या प्रकरणात राज कुंद्राला आठवड्याभरासाठी अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. राज कुंद्रा सध्या अटकेत असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली.

या प्रकरणातील अन्य आरोपी शार्लिन चोप्रा आणि पुनम पांडे यांच्यासह अन्य आरोपींनाही न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले असून पोर्नोग्राफीच्या अन्य एका प्रकरणात आपल्याला याच कलामांतर्गत अटक करण्यात आली आहे.

तसेच या तपासदरम्यान इलेक्‍ट्रॉनिक उपकरणं आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्याची आवश्‍यकता नसल्याचे कुंद्राच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. याची दखल घेत न्यायालयाने राज कुंद्राला आठवड्याभरासाठी अटकेपासून संरक्षण देत सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

अधिक वाचा  प्रियांका चतुर्वेदी यांनी निलंबनाच्या निषेधार्थ सोडले अँकरिंग