भारत स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमीत्त रायझिंग फॉउंडेशन संस्थेमार्फत रत्नागिरी चिपळूण येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य किट आणि गरज़ोपोयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या. रत्नागिरी चिपळूण येथील पूर ग्रस्तांना भेटून तेथील परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन हे कार्य करण्यात आले आहे. पूर आल्यामुळे बऱ्याच लोकांची हानी झाली आहे त्यांना मदत करण्याचे आवाहन सुद्धा रायझिंग फाउंडेशन मार्फत करण्यात येत आहे पूर ग्रस्तांना मदत करून रायझिंग फाउंडेशन संस्थेने माणुसकीचे चांगले दर्शन घडवून आणले आहे.

कार्यक्रमाला प्रसाद सपकाळ, संदीप भोसले, शशिकांत अडसूळ, अमित गोणेकर, मारोती ढवळे, किरण मारणे, अतुल मोकाटे, तुळशीराम डोरके, यलाप्पा वालदोर, ऋषिकेश भालेराव, प्रीती मारणे, प्रीती ढवळे, मुकुंद लंगडे आणि संजय कोकरे उपस्थित होते.

अधिक वाचा  गल्ली ते दिल्ली राजकारण्यांनी केलेली भ्रष्ट व्यवस्था पारदर्शक करण्याचे काम आम आदमी करणार - कृष्णा गायकवाड