भारतीय जनता पक्षाच्या वतीने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून बावधन बुद्रुक गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि थेट जनतेतून निवडून आलेल्या भाजपा सरपंच यामध्ये पथदिवे पाणीपुरवठा आणि अंतर्गत रस्ते याचा कायमच कलगीतुरा झालेला असतानाच आता त्यामध्ये बावधन महामार्ग खालील चौकाचे विनापरवाना सुशोभीकरणाच्या कामाबाबत ही सध्या गावभर हम करे सो…. कायदा ची चर्चा सुरू झाली असून धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या नावाला विरोध करण्यापेक्षा नागरिकांनी केलेल्या कामाची प्रशंसा करावी अशी अपेक्षा सरपंच गटाकडून केली जात आहे. बावधन बुद्रुक ग्रामपंचायतीमधील कर्मचारी भरतीचा प्रकार ताजा असतानाच विद्यमान सरपंच पियुषाताई किरण दगडे यांनी ओंकार गार्डन चौकामध्ये CSR फंडातून सुरू असलेल्या कामावरती सध्या सर्वच स्तरातून चर्चा सुरू असून हलक्या आवाजामध्ये विरोधाची ही भाषा आहे.

भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दोन नामांकित संस्थांमार्फत ओंकार गार्डन चौक याभागातील सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणाला सुरुवात केली जात असून सदर विनापरवाना कामावरती कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून शेकडो वाहने रात्रंदिवस प्रवास करत असतात त्यामुळे या रस्त्यांची देखभाल आणि या रस्त्यावरील पुलावर ज्यादा वजन न होण्यासाठी असंख्य महामार्गावरील मुलांना संरक्षण देण्याचे काम महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने केले जात असते. राष्ट्रीय महामार्गावर मुंबई ते कोल्हापूर या महाराष्ट्रातील हद्दीमध्ये असंख्य महानगरपालिका ग्रामपंचायती नगरपरिषदा व विविध प्राधिकरणे संलग्न असतानाही या भागांमध्ये कोणतेही काम करताना या सर्वांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगी असणे बंधनकारक असतानाही बावधन ग्रामपंचायतीच्या वतीने मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता विनापरवाना काम केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. संबंधित संस्थेच्या वतीने हे काम केले जात असेल तर पुणे महानगरपालिका आणि ग्रामपंचायत बावधन बुद्रुक यांची यंत्रणा हे काम करण्यासाठी कशी वापरली जात आहे? हाही सवाल स्थानिक नागरिकांच्या वतीने केला जात आहे.

अधिक वाचा  ‘पुणे की पसंत मोरे वसंत’ तात्या लागले कामाला, उभारताहेत ‘वॉर रूम’; जरांगे पाटलांचीही घेणार भेट

याभागात विनापरवाना काम केली जात असेल तर या कामामुळे पुलाला धोका होण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे तर याबाबत परवानगी न घेतल्याने ग्रामपंचायतील अनेक सदस्य यावरती आक्षेप घेत असून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करत आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी विद्यमान सदस्यांना फोन केल्यानंतरही त्यांनी व्यक्त होण्यास नकार दिला ही खरी शोकांतिका आहे.

नियमानुसार झाल्यास आनंद; पोरखेळ थांबवा
बावधन भागातील सध्या सुरू असलेला विकास पाहून पुणे परिसरातील असंख्य नागरिकांनी या भागांमध्ये राहण्यासाठी प्राधान्य दिले आहे. स्थानिक पातळीवरचे सर्वत्र राजकारण असते परंतु सध्या बावधन भागामध्ये असंख्य राजकीय कुरघोडीचे खेळ सुरू असून त्यामध्ये सामान्य जनता भरडली जात आहे.
सध्या बावधन भागातील लोकांना कचरा पाण्याची सोयीसुविधा आणि पथदिव्यांची अत्यंत गरज असून याकडे प्राधान्याने लक्ष देण्यापेक्षा करण आणि आपले नाव ठळक अक्षरात प्रसिद्ध करण्याची स्पर्धा सर्वांमध्येच लागली आहे.

अधिक वाचा  पुणे धरणसाखळीत २८.३९ टीएमसी पाणी; आता ‘टाटा’चा पाण्याचा आधार? उजनी मृतसाठ्याचाही 19TMC वापर

ग्रामस्थ

नियमांचे पालन आवश्यक –

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे काम करत असताना ग्रामपंचायतीच्या मदतीने या प्रमाणे काम होणे गरजेचे आहे. सध्या बावधन बुद्रुक ग्रामपंचायत महापालिकेमध्ये विलीन झाली असली तरीही सर्वसामान्य नागरिकांना नियमानुसारच काम होणे अपेक्षित आहे.

                  विद्यमान ग्रामपंचायत सदस्य.

धर्मवीर संभाजी महाराज मनामनात

छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कार्य कारभाराची चर्चा युगानयुगे होत असते. त्यांच्या नावाने बेकायदेशीर काम करणे अपेक्षित नाही.
कोणत्याही धर्म पुरुषाच्या नावाने बेकायदेशीर केले तर त्याला अभय मिळेल हा बालिशपणा आहे. स्थानिक नागरिक सुज्ञ असून त्यांना यागोष्टी सध्या आवडत असून योग्य वेळी नागरिक यावर विचार करून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत.

अधिक वाचा  कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात लढण्यास ठाकरे गटातील बड्यांचा नकार, आता आयात उमेदवार देण्याची वेळ

                     माजी सदस्य बावधन बु||

परवानगी घेणे आवश्यक –

राष्ट्रीय महामार्गावर मुंबई ते कोल्हापूर या महाराष्ट्रातील हद्दीमध्ये असंख्य महानगरपालिका ग्रामपंचायती नगरपरिषदा व विविध प्राधिकरणे संलग्न आहेत. महामार्ग प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ याचा विचार केला तर सर्वत्र नित्याने देखरेख करणे अशक्य आहे. सर्व शासकीय प्राधिकरणाने याची जाणीव ठेवण्याची गरज आहे.

सुशोभीकरण ही चांगली गोष्ट असली तरी या भागांमध्ये कोणतेही काम करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगी घेणे गरजेचे आहे. परवानगी घेण्यासाठी आलेल्या सर्वच लोकांना नकार दिला जात नाही महामार्ग सुशोभित करणे ही प्राधिकरणासाठी ही अभिमानास्पदच गोष्ट आहे. परंतु संबंधित उड्डाणपुलावरती परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे काम प्राधिकरनालाच करावे लागत असल्याने योग्य ती कारवाई केली जाईल.

सुहास चिटणीस
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण