पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यावर हरकती सूचना दाखल करण्यास आता केवळ पंधरा दिवस उरले आहेत. भविष्यातील पुणे आणि परिसराच्या विकासासाठी हा आराखडा अत्यंत महत्त्वाचा आणि दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे हद्दीतील गावांमधील नागरिकांसोबत, नगर नियोजक, आर्किटेक्ट, सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यवस्थापन शास्त्र, अभियांत्रिकी महाविद्यालये यांनीही विकास आराखड्याचा अभ्यास करून त्यावर सूचना, हरकती नोंदवायला हव्यात, तरच चांगला आराखडा तयार होईल आणि त्याची अंमलबजावणी शक्य होईल.

शहरात योग्य नियोजन का होत नाही असा सर्वसामान्य नागरिकाला नेहमीच प्रश्न पडत असतो, पण या नियोजनाचा पाया किंवा मूलाधार हा विकास आराखडा असतो याची कल्पना सर्वांनाच असते असे नाही. विकास आराखड्याबाबत तर विनाकारण गुप्तता पाळण्यात कडेच अधिक कल असतो. विकास आराखडा बनवण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक लोकाभिमुख अशीच व्हायला हवी, अन्यथा त्याचा मूळ हेतू कधीच सफल होत नाही हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळेच पीएमआरडीए चा आराखडा योग्य आहे किंवा नाही, त्यात काय त्रुटी आहेत, कोणते बदल व्हायला हवेत, कोणती आरक्षणे बरोबर आहेत, कोणती वाढवणे आवश्यक आहेत, नवीन कोणते प्रकल्प करता येणे शक्य आहे, याबाबत सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी आपले मत नोंदवणे आवश्यक आहे.

अधिक वाचा  ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

महापालिका हद्दीत समाविष्ट तेवीस गावांसह पीएमआरडीए चा प्रारुप विकास आराखडा दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दुर्दैवाने या आराखड्याबद्दल नागरिकांमध्ये फारशी जनजागृती झालेली दिसत नाही. महापालिका हद्दीतील 23 गावे ऊदा . वाघोली, मांजरी, खडकवासला, म्हाळुंगे, सुस, कोंढवे-धावडे आदी मोठ्या गावांमधील आरक्षणे अधिक काळजीपूर्वक आणि त्या गावातील गरज लक्षात घेऊन प्रत्यक्ष पहाणीच्या आधारावरच व्हायला हवीत. अशावेळी विकास आराखड्यातील आरक्षणाविषयी असणारे गैरसमज किंवा चुकीच्या पद्धती यांना थारा मिळणार नाहीत याची दक्षता त्यांना घ्यावी लागेल.

अधिक वाचा  ओमिक्रॉनचे 7 रुग्ण; घाबरू नका, काळजी घ्या- महापौर

विकास आराखड्याचा योग्य अभ्यास करून पुणेकरांसह प्रत्यक्ष हद्दीतील नागरिकांनी अधिकाधिक सूचना हरकतींवर भर द्यायला हवा, तरच नागरीकरणाचे एक आदर्श मॉडेल पीएमआरडीएच्या माध्यमातून उभे राहील .

हे नक्की करा
– आपल्या हद्दीतील आरक्षणे नीट तपासून पहा. चुकीच्या ठिकाणी हरकत नोंदवा.
– विकास आराखड्याची सर्व माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
– pmr.dp.planning@gmail.com या ईमेल वर हरकती सूचना पाठवा.

वरील सर्व विषयाला अनुसरून लोकांना या आराखड्याविषयी माहिती , शंका , हरकती आणि असलेल्या शंकाचे निरसन व्हावे या प्रामाणिक हेतुने भाजपा सहकार आघाडी वतीने आराखडा अभ्यासक इंजिनियर चेतनजी पेठे सर यांचे ॲानलाईन चर्चासत्र आयोजित केले आहे. येणारे काळात प्रत्येक नवीन २३ गावातील भागात ही चर्चासत्रे गावातील लोकांना एकत्र करून घेतली जाणार आहेत .

अधिक वाचा  शनिदेवाची या राशीवरच विशेष कृपा; अन् मेहनती आणि दयाळूही

कृपया ह्या ॲानलाईन चर्चासत्रात सहभाग घ्यावा आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपला हातभार लावावा ही विनंती सचिन दशरथ दांगट अध्यक्ष : भाजपा सहकार आघाडी पुणे शहर वतीने करण्यात आली आहे.