अफगाणिस्तानातील परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी 7 LKM येथे मंगळवारी मोठी बैठक झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात येणाऱ्या प्रत्येक अल्पसंख्यक व्यक्तीला मदद केली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. या बैठकीला गृह मंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि एनएसए अजित डोवालही उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, येणाऱ्या काही दिवसांत भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात आवश्यक सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “भारताने केवळ आपल्या नागरिकांचेच संरक्षण नव्हे, तर ज्या शिख आणि हिंदू अल्पसंख्यकांची भारतात येण्याची इच्छा आहे, त्यांचेही संरक्षण करायला हवे आणि त्यांना आश्रयही द्यायला हवा. एढेच नाही, तर आपण त्यांना शक्य ती सर्व प्रकारची मदतही करायला हवी. तसेच मदतीसाठी भारताकडे डोळे लावून बसलेल्या आपल्या अफगान भाऊ आणि बहिणींना मदद केली जाईल,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

अधिक वाचा  दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' प्रवाशाला  पुण्यात होम क्वारंटाईन

या बैठकीत पंतप्रधान मोदींचे मुख्य सचिव डॉक्टर पीके मिश्रा, एनएसए अजित डोवाल आणि कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि राजदूत रुद्रेंद्र टंडनदेखील बैठकीत उपस्थित होते, असे बोलले जाते. राजदूत टंडन काबूलहून येणाऱ्या विमानाने आज जामनगरमध्ये दाखल झाले.

अफगाणिस्तानसाठी विशेष क्रमांक जारी –

यातच परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी आज मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून 24 तास चालणारे विशेष अफगाणिस्तान सेलचे क्रमांक जारी केले आहेत.

Phone numbers:           +91-11-49016783

अधिक वाचा  Omicron Variant चा कहर, राज्यात 13 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध - आरोग्यमंत्री

                                      +91-11-49016784

                                      +91-11-49016785

WhatsApp number:            +91-8010611290
E-mail:                           SituationRoom@mea.gov.in