काबुल – अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा तालिबानचा कब्जा झाला आहे. सततच्या लढाया आणि राजकीय अस्थिरतेमुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना गरिबीचा सामना करावा लागत आहे. मात्र असे असले तरी अफगाणिस्तान हा दक्षिण आशियाई देशांमधील सर्वात श्रीमंत देश आहे, असे सांगितल्यास ते कुणाला खरे वाटणार नाही. मात्र ही बाब सत्य आहे. संपन्नतेच्या बाबतीत अफगाणिस्तान भारतालाही मागे टाकू शकतो. त्यामुळेच तालिबान या देशावरील ताबा सोडू शकत नाही. तसेच अमेरिका आणि रशियासारख्या महाशक्तीही वारंवार अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतात.

सर्वसाधारण अंदाजानुसार अफगाणिस्तानमध्ये तीन ट्रिलियन डॉलर एवढ्या किमतीची खनिज संपत्ती दडलेली आहे. अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेच्या माध्यमातून २०१० मध्ये येछे एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये तज्ज्ञांना अफगाणिस्तानमध्ये सुमारे ३ ट्रिलियन डॉलर एवढ्या किमतीच्या खनिजांच्या साठ्यांची माहिती मिळाली होती. २०२० मध्ये अहमद शाह कतवाजाई यांनी एक लेख प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी अफगाणिस्तानमध्ये असलेल्या या खनिजांच्या साठ्यांची किंमत ३ ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक असल्याचे सांगितले होते.

अधिक वाचा  इराणमधील सफरचंदे बाजारात दाखल; सुकामेव्याची आवकही सुरळीत

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानमध्ये लोह, तांबे, कोबाल्ट, सोने आणि लिथियमचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनने सांगितले की, जर अफगाणिस्तानमधील खनिज साठ्यांचा वापर केला तर ते सौदी अरेबियाची बरोबरी करू शकतात. अफगाणिस्तानमध्ये ६० मिलियन मेट्रिक टन तांबे, २.२ मिलियन टन लोह, १.४ मिलियन टन लँटम, नियोडिमियम आणि अॅल्युमिनियम, सोने आणि लिथियमचे साठे आहे. या सर्व साठ्यांचा वापर केल्यास अफगाणिस्तान सौदी अरेबियाची बरोबरी करू शकतो.

काही वृत्तांनुसार अफगाणिस्तानमधील हे दुर्मीळ खनिज साठे पृथ्वीवरील सर्वात मोठे खनिज साठे आहेत. सध्याच्या काळात दुर्मीळ खनिजे ही याक्षणी तंत्रज्ञानाची खूप मोठी गरज आहे. त्याच्या मदतीने मोबाईल फोन, टीव्ही, हायब्रिड इंजिन, संगणक, लेझर आणि बॅटरी तयार केली जाते. पेंटॅगॉनमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गझनी प्रांतातील बोलिव्हियामध्ये मोठ्या प्रमाणात लिथियमचे साठे आहेत, हे जगातील सर्वात मोठे लिथियमचे साठे आहेत.

अधिक वाचा  ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका, कसे पडले नाव जाणून घ्या.

दरम्यान, अफगाणिस्तानमधील या खनिज संपत्तीचा शोध सर्वप्रथम सोव्हिएट युनियनने घेतला होता. मात्र १९८९ मध्ये सोव्हिएट युनियनचे विघटन झाल्यानंतर हा कार्यक्रम थांबला. मात्र तेव्हाचे नकाशे जपून ठेवण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेने हे नकाशे शोधून २००६ मध्ये नव्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातून या संपत्तीची माहिती समोर आली. अफगाणिस्तानमध्ये सध्या १४०० हून अधिक खनिज क्षेत्रे आहेत. मात्र या खाणकामातून मिळणाऱ्या महसुलामध्ये अफगाणिस्तान सरकारला दरवर्षी सुमारे ३०० मिलियन डॉलरचे नुकसान होत आहे.