पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ (LPG Price hike) करण्यात आली आहे.

यामुळे दिल्लीतील घरगुती सिलिंडरच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा दर 859.5 रुपये झाला आहे. ही दरवाढ सोमवारी रात्रीपासूनच लागू होणार आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरचा दर 886 रुपये, मुंबईमध्ये 859.5 रुपये, लखनऊ 897.5 रुपये एवढे दर झाले आहेत. याचबरोबर 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर 68 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर 1618 रुपये झाला आहे.

LPG rate Hike: तेल कंपन्यांनी दर महिन्याच्या पहिल्या आणि पंधराव्या तारखेला एलपीजी गॅसच्या (Gas Cylinder Price hike) दरांचा आढावा घेतात. 1 जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर 25 रुपयांनी वाढविले होते. यानंतर 1 ऑगस्टलाही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 73.5 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती गॅसच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले ‘आता लवकरच संपूर्ण राज्याचा…’

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने केंद्र सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मात्र, सरकार सर्व आंतरराष्ट्रीय किंमतींवर ढकलत आहे. काहीवेळा युपीए सरकारवर वाढत्या किंमतींचे खापर फोडले जात आहे.