उद्योगपती मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ बाजारात पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानींनी जिओच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवली. जिओमुळेच देशात स्वस्त इंटरनेट उपलब्ध झालं. त्यानंतर जिओनं आपले फोनदेखील बाजारात आणले. आता जिओफोन नेक्स्टची भारतीय किंमत ऑनलाईन लीक झाली आहे. याशिवाय फोनचे स्पेसिफिकेशन्सदेखील समोर आले आहेत. स्वस्त एँड्रॉईड स्मार्टफोनबद्दलची बरीचशी माहिती पुढे आली आहे.

JioPhone Next ची निर्मिती रिलायन्स जिओकडून केली जात आहे. गुगलच्या सहकार्यानं फोन डेव्हलप करण्यात येत आहे. हा फोन अँड्रॉईड ११ वर काम करू शकतो. लेटेस्ट लीकनुसार, फोनचा डिस्प्ले ५.५ इंचाचा असेल. यात दोन स्टोरेज कॉन्फिग्रेशन आणि ४जी VoLTE कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते. जिओफोन नेक्स्टची घोषणा जूनमध्ये झालेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली होती.

अधिक वाचा  LPG सिलेंडर स्वस्त ची अपेक्षाभंग; पुन्हा १०० रुपयांनी महाग

जिओफोन नेक्स्टची किंमत ३ हजार ४९९ रुपये असण्याची शक्यता आहे. त्याची विक्री सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते. जिओनेक्स्टची किंमत ५० डॉलरपेक्षा कमी असेल अशी माहिती याआधी समोर आली होती. त्यामुळे फोनची किंमत भारतात ४ हजारांपेक्षा कमी असेल असा अंदाज बांधण्यात आला होता.

जिओफोन नेक्स्टचे स्पेसिफिकेशन्स

जिओफोन नेक्स्टमध्ये अँड्रॉईड ११ असू शकतो. डिस्प्ले ५.५ इंचाचा असण्याची शक्यता आहे. क्वॉलकॉम क्यूएम २१५ प्रोसेसर असेल. २ किंवा ३ जीबी रॅम असू शकेल. १६ किंवा ३२ जीबी स्टोरेज असण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. तर सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा असू शकेल. जिओफोन नेक्स्टमध्ये 4G VoLTE सपोर्टसह ड्युअल सिम सपोर्ट असू शकतो. फोनची बॅटरी २५०० एमएएच असण्याची दाट शक्यता आहे.