पुणे – शहरातील दहा रुग्णालयांतील शहरी गरीब योजना बंद करण्यात आली असून, यामध्ये शहरातील विविध भागातील मोठ्या रुग्णालयांचा समावेश आहे.

केंद्र सरकारची ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ आणि महापालिकेची ‘शहरी गरीब योजना’ अशा दोन्ही योजना सुरू असल्याने त्याचे ‘डुप्लिकेशन’ होते, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

अनेक नागरिक दोन्ही योजनांचा लाभ घेतात. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या दहा रुग्णालयांमध्ये महापालिकेने स्वत: सुरू केलेली योजना बंद करण्यात आली आहे.

शहरी गरीब योजना बंद केलेली रुग्णालये

औंध                       एम्स रुग्णालय
कात्रज                     भारती रुग्णालय
कोथरूड                  देवयानी रुग्णालय
कर्वे रस्ता                  गॅलॅक्‍सी रुग्णालय
बालाजीनगर               पवार मल्टिस्पेशालिटी रुग्णालय
बिबवेवाडी                 राव नर्सिंग होम
खराडी                     श्री रुग्णालय
कसबा पेठ                सह्याद्री सूर्य रुग्णालय
हडपसर                   एच. व्ही. देसाई रुग्णालय
फुरसुंगी                   शिवम मल्टिस्पेशालिटी रुग्णालय

अधिक वाचा  कोथरूडला पाच दिवशीय आमदार महोत्सवाची उत्साही सांगता ; प्रचंड प्रतिसादापुढे नाट्यगृह अपुरे