कागल: उपेक्षित वंचित यांच्या वेदना वेशीवर टांगून त्यांना न्याय मिळवून देण्याचे सामर्थ्य पत्रकारिते मध्ये असते व तेच काम मोठ्या निष्ठेने व तळमळीने पत्रकार मधुकर भोसले यांनी वीस वर्षे केले आहे.त्यांच्या लेखणीतून नेहमी मानवताच प्रकट होते असे प्रतिपादन शिवम प्रतिष्ठान चे संस्थापक व माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.

बस्तवडे ता कागल येथील पत्रकार मधुकर भोसले याना जिल्हा परिषदेच्या वतीने जाहीर झालेल्या आचार्य अत्रे पुरस्काराबद्दल बस्तवडे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.देशमुख बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोनाबाई वांगळे होत्या.यावेळी शाल श्रीफळ फेटा व मानपत्र देऊन मधुकर भोसले यांचा सत्कार इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी पुढे बोलताना देशमुख म्हणाले,गावकी भावकी गट तट या पलीकडे जाऊन झालेला हा सन्मान चांगुलपणाचा आहे.

अधिक वाचा  समुद्रपातळीत तिप्पट वाढ; या देशाचे अस्तित्वच धोक्यात; पाण्यातूनच जगाला आवाहन

वारकरी संस्कारा मुळे भोसले यांनी लेखणी चे सत्व व तत्व जपून तिचा विधायक वापर केला.गावोगावी विधायक कार्यात असा एकोपा दिसला पाहिजे की ज्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळते. सत्काराला उत्तर देताना मधुकर भोसले यांनी ग्रामस्थांप्रति कृतज्ञता व्यक्त करून संत साहित्याचे ऋण न फिटणारे असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. शिवाजीराव होडगे यांनीही मार्गदर्शन व शुभेच्छापर भाषण केले.

संत साहित्याचे पुणे येथील गाढे अभ्यासक सचिन पवार यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन आर.डी. भोसले यांनी केले.यावेळी एस.के.पाटील यांचेही भाषण झाले.

कार्यक्रमास मंडलिक कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रा.बापूसाहेब भोसले पाटील, उपसरपंच जयवंत पाटील तसेच प्रकाश पाटील, प्रवीण पाटील, पोलीस पाटील धनाजी वायदंडे, किरण पाटील, विष्णू वांगळे, माजी सरपंच संताजी पाटील, तानाजी पाटील, ए.पी.पाटील, उदय भोसले, गंगाधर शिंत्रे, शरद भोसले, एम.के.माळी, रामचंद्र पाटील, प्रवीण दाभोळे, सोमनाथ यरनाळकर, बंडा गुरव, के.बी.चौगुले, अनंत घोळवे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

प्रास्ताविक माजी सरपंच सातापा कांबळे यांनी तर सूत्रसंचालन सौ.वैशाली पाटील यांनी केले.आभार जयवंत पाटील यांनी मानले.