पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने काल बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी सुतारदरा भागातील भाजी विक्रेत्यांच्या हातगाडींवर कारवाई केली आहे. सुतारदरा मुख्य रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात भाजी विकण्याची परवानगी दयावी अशी मागणी स्वारद फाउंडेशन संस्थापिका/अध्यक्षा सौ. स्वाती शरद मोहोळ यांनी माधव जगताप म.न.पा उपायुक्त अतिक्रमण विभाग यांच्याकडे केली आहे.

सुतारदरा आणि परिसरामध्ये “हातावर कमवून पानावर खाणारे “ नागरिकच जास्त आहेत. दिवस भरात काही कमवले नाही तर रात्री स्थाण्याची सोय होत नाही, कोरीना महामारी आणि टाळे बंदीमुळे नागरिकांच हाताला कामे नाहीत. पडेल ती कामे करून, मिळेल ती कामे करून नागरिक कशी कशी गुजराण करीत आहेत, जगत आहेत. स्मार्ट सिटी, मेगा सिटी, शांघाय असे प्रोजेक्ट करण्यापेक्षा नागरिक जगवणे गरजेचे आहे.

अधिक वाचा  Bipin Rawat: जागतिक स्तरावर शोककळा, शूर योद्धाला विविध देशांचीही श्रद्धांजली

‘कालच्या कारवाही मध्ये अंदाजे ६० ते ७० भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एका भाजीवाल्याच्या घरी अंदाजे ६ ते ७ सदस्य असतात. आपणच विचार करा की, किती लोकं उपाशी राहणार ? बरे यांचे काम धंदे बंद झाल्यामुळे, पोटा पाण्यासाठी काही तरी करावेच लागणार, मग आपोआपच गुन्हेगारी कडे कल वाढतो. आपण या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा आणि सुतारदरा मुख्य रस्त्या वरील भाजी विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात भाजी विकण्याची परवानगी दयावी. छोटे छोटे स्टॉल किंवा पथारी लावून दुपारी ३ ते सायं ६ व्यावसाय करण्याची परवानगी दयावी हि मागणी स्वारद फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.