पुणे : आपल्या राजकीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहे. त्यांच्या युक्ती, बुद्धी, शक्तीचं गुणगान इतिहासकारांनी केलं आहे. शिवाजी महाराजांनी देशात नवी चेतना जागृत केली. त्यामुळे शिवाजी महाराज हे फक्त भारताचेच नाही, तर जगाचे हिरो बनले आहेत अशा गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले आहे.

भगत सिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहे. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी सोमवारी(दि.१६) त्यांनी सकाळी सिंहगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी गडाची पाहणी करत छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरेंना अभिवादन केलं. तसेच काही ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, राज्यपालाचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्यासह सर्व संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

अधिक वाचा  परमबीर सिंह यांचं निलंबन? मुख्यमंत्री ठाकरेंकडून स्वाक्षरीही

यावेळी कोश्यारी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्यासारख्या इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दल बालकांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला. तसेच शिवाजी महाराजांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांनी गाजविलेल्या अद्वितीय पराक्रमाचा इतिहास शिक्षणाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहचणं गरजेचे आहे.

अधिक वाचा  ४ डिसेंबरला का साजरा केला जातो? भारतीय नौदल दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

सिंहगडवासियांच्या पाहुणचाराने राज्यपाल भारावले…

सिंहगडवासियांनी राज्यपालांच्या स्वागतासाठी अप्रतिम रांगोळ्या काढल्या होत्या. तसंच महिलांनी त्यांना औक्षण देखील केलं. नागरिकांच्या स्वागताने कोश्यारी भारावले. तसेच उत्तराखंडमध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा तिकडे या अशाप्रकारे राज्यपालांनी सिंहगडवासियांना उत्तराखंडला येण्याचे आमंत्रणही दिले.

शिवशार बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली. यावेळी राज्यपाल महोदयांनी पुरंदरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तसंच अखंड आयुष्य शिवरायांप्रती वाहून घेतल्याने त्यांना धन्यवाद दिले.