१५ ऑगस्ट निमित्त राजे क्लब ट्रस्ट, शेवाळेवाडी यांच्या वतीने नांदणी (ता-शिरोळ, जी-कोल्हापूर) गावातील २०० पेक्षा जास्त कुटुंबियांना दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या अन्नधान्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामध्ये जवळपास ३५ ते ४० सभासदांनी सहभाग नोंदविला. कारभारी-लयभारी फेम अभिनेता निखिल चव्हाण यांनी या उपक्रमासाठी मोलाची मदत केली व पुरग्रस्तांची आपुलकीने विचारपूस केली.

३०० किलोमीटर दूर असलेल्या बांधवाना आपल्याबद्दल सहानभूती वाटते आणि ते सुद्धा आपल्या दुःखामध्ये सहभागी आहेत हे दर्शविण्यासाठी व त्यांचे सांत्वन करण्यासाठी राजे क्लबची टीम नांदणी गावामध्ये दाखल झाली.

सद्य परिस्थिती खूपच गंभीर आहे आणि यामध्ये नागरिकांचे घराचे आणि शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. २-३ दिवस पाऊस सुरु राहिला तर तेथील नागरिकांची घालमेल सुरु होते. विस्थापित होणे आणि पुन्हा संसार थाटणे हे नित्याचे झाले आहे परंतु यावर काहीतरी उपाययोजना करता येईल का यावर सरकारने सकारात्मक विचार करावा अशी व्यथा पूरग्रस्त मांडत होते.

अधिक वाचा  महापालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर

पुरग्रस्तांचे दुःख खूप मोठे आहे. एवढी हलाखीची परिस्थिती असूनही नागरिकांनी आमचे उत्स्फुर्दपणे स्वागत केले. माणुसकीने तयार झालेले या गावाबरोबरील नाते आयुष्यभर टिकेल. या उपक्रमासाठी माझ्या सदस्यांनी आठवडाभर मेहनत घेतली तसेच या उपक्रमासाठी मित्र मंडळींनी व नागरिकांनी मोलाची मदत केली याबद्दल सर्वांचे आभार मानतो असे राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमित पवार म्हणाले.

यावेळी गावचे सरपंच सौ. संगीता तगारे, सदस्य दीपक कांबळे, सदस्य दिलीप परीट, सदस्य सुधा माळी ताई, सदस्य गटारे ताई, सर्व राजे क्लब सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सभापती दीपाली परीट ताई यांनी सर्व टीमची आपुलकीने विचारपूस केली.

अधिक वाचा  Rakhi sawant: 'माझ्या बॉडीचा हा पार्ट खोटा'; 16 लाख किंमत

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल बावणे यांनी केले.