पुणे: स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राज्यपाल भेटीगाठी घेत असताना काँग्रेसचे विधान परिषदेतील नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत छेडलं. त्यानंतर राज्यपालांनी खास शैलीत उत्तर दिलं.

राज्यपाल काय म्हणाले?

माझ्यासोबत अजित पवार आहेत. ते माझे मित्र आहेत. सरकार आग्रह धरत नाही तुम्ही का धरता? असा सवाल राज्यपालांनी केला. असा सवाल करत राज्यपालांनी गुगली टाकली.

अजित पवार म्हणाले

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

राज्यपालांनी दिलेल्या उत्तरावर उपमुख्यमंत्री अजित पवार हसत हसत म्हणाले, आज स्वातंत्र्य दिन आहे. या विषयावर नंतर बोलेन म्हणाले.