भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्ती होऊन 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभरामध्ये हा स्वतंत्र दिन उत्सव साजरा केला जात असताना बावधन मार्केट यार्ड मध्येही भारतीय स्वतंत्र उत्सवाची 75 वर्षानिमित्त बावधन मार्केटयार्ड येथे माजी आमदार व राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी मेधाताई कुलकर्णी यांच्यासह बावधन मार्केट यार्ड मध्ये सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावधन मार्केट यार्डचे संचालक निलेश अर्जुन दगडे (उपमुख्य संचालक), मेघा गोरख दगडे (संचालिका), अमर यशवंत कोकाटे (संचालक),  जितेश दिपक शेलार (संचालक), ईरफान रहिमान ईजेरी (संचालक) यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक हजर होते.

अधिक वाचा  इतिहासातील सर्वांत मोठी 41 टक्के वाढ; विलीनीकरणावर कर्मचारी ठाम

बावधन मार्केट यार्ड येथील एका साडी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात निमित्त कोथरूडच्या माजी आमदार व राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते. रीतसर कार्यक्रम झाल्यानंतर आमदार मेधा कुलकर्णी यांनी देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या महोत्सवानिमित्त कार्यक्रम केले जात असून यामध्ये आपणही सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत बावधन मार्केट यार्ड चे मुख्य संचालक गोरख दगडे यांनी सर्व नागरिकांना आवाहन करत राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याचे जाहीर केल्यानंतर सुमारे शेकडो नागरिकांनी एकत्र येत आमदार मेधा कुलकर्णी यांच्या समवेत online सामूहिक राष्ट्रगीत गायन करून भारत मातेला वंदन केले.

अधिक वाचा  CNG चे दर २ महिन्यांत ३री वाढ; १४ रुपयांनी वर्षभरात वाढले दर !

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थापक संचालक गोरख दगडे यांनी केले तर आभार संचालक अमित तोडकर यांनी मानले.