औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन महाराजांची आग्र्याहून सुटका… या ऐतिहासिक घटनेला १७ ऑगस्ट रोजी ३५५ वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त  छत्रपती शिवाजी महाराज यांचे पायदळ प्रमुख सरदार पिलाजी गोळे यांचे थेट वंशज ॲड. श्री. मारुती (आबा) गोळे व त्यांच्यासोबत 30 मावळे गरुडझेप मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगड शिवज्योत घेऊन धावणार आहेत त्यांना या मोहिमेसाठी आज शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान आज सुर्यदत्त कॉलेज बावधन इथे करण्यात आला नगरसेवक किरण दगडेपाटील व सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अधिक वाचा  किरण गायकवाड ‘देवमाणूस २’मध्ये दिसणार कि नाही?

याप्रसंगी मा.पोलीस अधिकारी श्री. भानुप्रताप बर्गेसाहेब, उत्सवप्रमुख अमितजी गायकवाड, मावळ तहसिलदार मधुसूदन बर्गेसाहेब, शिवशाहीर सौरभजी करडे, सिंहगड अभ्यासक नंदकुमार मते, रिम कॉलेज चेअरमन सुरजजी शर्मा, शांतारामजी इंगवले मा.जि.प.सदस्य, बापुसाहेब दगडे पाटील, धनंजय दगडे पाटील, प्रभाग 10 अध्यक्ष सागरजी कडू, राजेशजी कुलकर्णी उपस्थित होते..