स्वारद फाऊंडेशन तर्फे नागपंचमी निमित्त समर्थ कॉलनी, सुतारदरा, कोथरूड येथे खास महिलांसाठी ६०० किलो बर्फ वापरून प्रथमत: शिवपिंडी आणि नागदेवता तयार करण्यात आली होती. सुतारदरा भागामध्ये अशा प्रकारचा अनोखा उपक्रम प्रथमच होत असल्याने परिसरातील असंख्य महिला भगिनींनी या हिमरुपी शिवलिंगाची पूजा करून नागपंचमीचा सण साजरा केला.

सुतारदरा भागात संस्कृती जिव्हाळा व आपापसातील सलोखा वाढण्यासाठी स्वारद फाऊंडेशन तर्फे अनिल नवनवीन प्रयोग केले जात असून या भागातील महिला भगिनींना सुरक्षित आणि उत्साही वातावरणात नागपंचमीचा सण साजरा करता यावा यासाठी सदरील कार्यक्रमाचे आयोजन स्वातीवहिनी मोहोळ यांच्यावतीने करण्यात आले होते.तसेच या कार्यक्रमासाठी महिलांचा सहभाग वाढावा यासाठी स्वारद फाउंडेशनच्या वतीने सुतारदरा परिसरातील ५००० भगिनींना घरोघरी जाऊन मेहंदी कोन चे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा  प्रियंकाच्या पतीची 13 व्या वर्षी पहिली गर्लफ्रेन्ड ; भलीमोठी अफेअर लिस्ट

शिवपिंड आणि नागदेवता यांची ६०० किलो बर्फ वापरून निर्मिती जोतिबा शिंदे , योगेश जाधव आणि सहकाऱ्यांनी केली आहे. परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी रंगा लावून संध्याकाळी दर्शनाचा लाभ घेतला.