नियमाचे उल्लंघन करत इंटरनॅशनल कॉल केल्याने रत्नागिरी शहर पोलिसांनी येथील बाजारपेठेतील दोघांना अटक केली. मुंबई एटीएसने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील मोबाईल शॉपी मालकासह पनवेल येथील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, देशविरोधी कारवायांसाठी हे इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर सुरू होते का? तसेच कॉल सेंटर चालवण्यामागचा उद्देश काय होता? याबाबत सध्या तपास सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. यावेळी पोलिसांनी सर्व्हर, लॅपटॉपसह काही साहित्य देखील जप्त केले आहे. सर्व्हर रत्नागिरीत आणि कॉलिंग सेंटर मुंबईतील वांद्रेमधील एका इमारतीत सुरू होते. अशी देखील माहिती आता समोर येत आहे.

अधिक वाचा  "अशा ठिकाणी कशाला जायचं?" फडणवीसांचा साहित्य संमेलनाला जायला नकार

दरम्यान, रत्नागिरीत दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई करत शहरातील अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. मास्टर माइंडसह दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करत इंटरनॅशनल कॉल केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

इंटरनॅशनल कॉलप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून हा कॉल करण्याचा उद्देश आणि कारण याचा तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. तपासअंती कारण कळेल, यावेळी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांनी सांगितले.