नवी दिल्ली : अमेरिकास्थित इंडियासपोरा या संस्थेने जारी केलेल्या जगभरातील दानशूर १०० भारतीय उद्योगपतींच्या यादीत अदानी समूहाचे सीईओ गौतम अदानी, रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन तथा संस्थापक नीता अंबानी आणि आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांचा समावेश झाला आहे.

नऊ सदस्यीय पथकाने मान्यवर अभ्यासांच्या आधारे ही यादी तयार केली आहे. या यादीतील इतर नावांत अमेरिकेतील माँटे अहुजा, अजय बंगा, मनोज भार्गव, कॅनडातील सोनम अजमेरा, बॉब धिल्लन व आदित्य झा, ब्रिटनमधील मोहंमद अमेर्सी, मनोज बंडाळे आणि कुजिंदर बहिया यांचा समावेश आहे.

याशिवाय यूएई, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया येथील दानशूर भारतीयांची नावेही यादीत आहेत. या उद्योगपतींनी आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, कला व संस्कृती, मूल्यशिक्षण, राेजगारक्षमता आणि अन्न असुरक्षा या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आहेत.

अधिक वाचा  ठाकरेंवर ममता बॅनर्जींना विश्वास; म्हणाल्या “आम्ही पुरुन उरलो, सरकारी दहशतवाद्यांचा महाराष्ट्रही…