पुणे : नदीपात्रातील अतिक्रमणांमुळे नदीचा काटछेद (क्रॉस सेक्शन) कमी होऊन नदीची वहन क्षमता कमी झाली आहे, तसेच पूर पातळीत पाच फु टांनी वाढ झाली आहे. या परिस्थितीकडे डोळेझाक करत नदीकाठ सुधार योजनेअंतर्गत १ कोटी ४९ लाख चौरस फुटांची बांधकामे प्रस्तावित के ली आहेत. त्यामुळे नदीच्या वहन क्षमतेवर विपरीत परिणाम होणार असून भविष्यात हजारो घरे पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे ही योजना रेटून नेल्यास निष्पाप जनतेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.

नद्यांची पाणलोट क्षेत्रं डोंगर दऱ्यांची आणि तीव्र उतारांची आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी खूप वेगाने नदीला मिळते. त्यातून पूर पातळी वाढत असल्याचे यापूर्वीच सप्रमाण सिद्ध झाले आहे. ‘दी एनर्जी अ‍ॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूट- टीईआरआय- टेरी’ या संस्थेने २०१४ मध्ये ‘महाराष्ट्र स्टेट अ‍ॅडॉप्शन अ‍ॅक्शन प्लॅन’ नावाचा अहवाल राज्य शासनाला दिला आहे. यामध्ये भविष्यात पुण्यामध्ये पावसाचे प्रमाण ३७.५० टक्क्यांनी वाढेल, तसेच ढगफु टी होईल, असे स्पष्ट के ले आहे. सध्या विविध प्रकारच्या अतिक्रमणांमुळे नदीची वहन क्षमता कमी झाली आहे. नदीपात्रातील मेट्रो प्रकल्पाचे काम, सांडपाणी प्रकल्प, वाहनतळ अशा कामांमुळे नदीचा काटछेद कमी झाला असून वहन क्षमता कमी झाली आहे. सन १९९७ मध्ये खडकवासला धरणातून ९० हजार क्युसेक (घनफू ट प्रति सेकं द) या वेगाने पाणी सोडण्यात आल्यानंतर जी पातळी पाण्याने गाठली होती तीच पातळी २०११ साली ६७ हजार २१२ क्युसेक वेगाने पाणी सोडल्यावर गाठली गेली. सन २०१९ मध्ये ४५ हजार ४७४ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्यानंतर पुण्यात हाहाकार उडाला होता, या उदाहरणांवरूनच नदीची वहन क्षमता कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.

अधिक वाचा  संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; धक्कादायक निर्णय

नदीकाठ सुधार योजनेअंतर्गत १ कोटी ४९ लाख चौरस फु टांची बांधकामे प्रस्तावित आहेत. भिंती उभारून पात्र आक्रसले जाणार आहे. त्यामुळे संभाव्य पुराची हमीच महापालिकेने दिली आहे. ६० हजार क्युसेक वेगाच्या प्रवाहाला निश्चित के लेली पूररेषा जर ४५, ४७४ क्युसेक प्रवाहाने ओलांडली जात असेल तर योजनेतील बांधकामांमुळे ४५ हजार क्युसेकपेक्षाही कमी पाणी सोडल्यास शहराला पुराचा निश्तिच धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरात के वढा मोठा प्रलय होईल, याची जाणीव राजकारणी आणि प्रशासनाला नाही.

पूरपातळीत पाच फुटाने वाढ

मुठा नदीतील मेट्रोच्या बांधकामामुळे नदीच्या पूरपातळीत पाच फु टांनी वाढ झाली आहे. त्याबाबतचा अहवाल सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशनने (सीडब्ल्यूपीआरएस) दिला आहे. मुठा नदीत ६० हजार क्युसेकचा प्रवाह निळ्या पूररेषेच्या पातळीला वाहणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात हा प्रवाह निळ्या पूररेषेच्या पाच फूट वरून वाहात आहे. योजनेमुळे हजारो घरे पुराच्या पाण्याने वेढली जाण्याची भीती आहे. अद्यापही या अहवालावर राजकारणी आणि प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे विशेष.

अधिक वाचा  दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' प्रवाशाला  पुण्यात होम क्वारंटाईन

पात्र आणखी अरूंद

नदीपात्रात भिंती उभारून १ हजार ५४४ एकर (६२५ हेक्टर) जमीन विकसित करण्यात येणार आहे. तसेच १८० एकर म्हणजेच ७३ हेक्टर शासकीय जागेची विक्री करून तेथे बांधकामे नियोजित आहेत. या सर्व जागेवर १ कोटी ४९ लाख चौरस फु टांची बांधकामे होणार आहेत. त्यामुळे नदीपात्र आणखी अरूंद होणार आहे. त्यामुळे भविष्यात पुणे शहराला कमी विसर्गातही पुराचा धोका असणार आहे.

अतिक्रमणांमुळे नदीपात्र आक्रसले आहे. खडकवासला धरणाची विसर्ग क्षमता १ लाख क्युसेक एवढी आहे. धरणाच्या खालील बाजूला पाऊस पडल्यास विसर्गात किमान ५० हजार क्युसेकने वाढ होते. ६० हजार क्युसेकच्या प्रवाहाला निश्चित के लेली पूररेषा ४५ हजार क्युसेकलाच ओलांडली जात असेल तर भविष्यात के वढा मोठा प्रलय येईल, याची कल्पना करवत नाही. त्यामुळे पूर का येतो या प्रश्नांची उत्तरे आपण कधी शोधणार आहोत.

अधिक वाचा  माऊलींचे विचार समाजासाठी ७२५ वर्षानंतरही प्रेरक - राज्यपाल

– सारंग यादवाडकर, पर्यावरणप्रेमी