स्मशानभूमीतील सर्व सोयी सुविधा शास्त्रीनगर स्मशानभूमीत देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने करोडो रुपयांचा निधी वर्गीकृत करून शास्त्रीनगर स्मशानभूमी ही अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला परंतु सत्ता गेल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेला एक स्तुत्य उपक्रम दुर्लक्षित करण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने केले जात असून यामध्ये महापालिकेच्या करोडचा निधी व्यर्थ जात असून हा निधीचा अपव्यय फक्त राजकीय कारणामुळे कारणास्तव केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

कोथरूड शास्त्रीनगर भागांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन विद्यमान सदस्य लोकप्रतिनिधी म्हणून नियुक्त झाल्यानंतर स्थानिक नगरसेविका जयश्रीताई मारणे यांच्यासह अन्य सदस्यांनीही महानगरपालिकेचे करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्यातून विद्युत गॅस वरची धनी आणि सर्व सोयी सुविधा देत पेट स्मशानभूमीच्या तोडीस तोड स्मशानभूमी करण्याचे काम केली त्यानंतर सर्व अंतर्गत कामे झाल्यावर मुख्य रस्त्यावरून या स्मशानभूमी ची माहिती मिळण्यासाठी करोडो रुपयाची कमान त्यावरती संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमनाचे संकल्पचित्र अशी सर्व सुविधा दिल्यानंतरही आज पालिकेत झालेल्या सत्तांतर यामुळे स्मशानभूमी ला मरणासन्न अवस्था आली असून सर्वसामान्यांना या राजकीय बदलाचा त्रास सहन करावा लागत असून अंत्यविधीसाठी आलेल्या सर्व नागरिकांना या सर्व सोयी-सुविधांचा अभाव यांचा सामना करावा लागत आहे.
श्रीनगर समशान भूमीतील सर्व पत्रे खराब झाले आहेत, अक्षरशः पत्र्यांची चाळण झाली आहे. अंत्यविधी करताना नातेवाईकांना खूप त्रास होत आहे , माणसाला मेल्यानंतर इथे सरणावर त्रास सहन करावा लागत आहे परिसरामध्ये अस्ताव्यस्त सर्वत्र दारूच्या बाटल्या पडल्या असून हा परिसर मद्यपींचा अड्डा झाला असला भूतविद्या साठी आलेल्या लोकांना आवश्यक असलेल्या नळाला पाणी नाही, ते महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने पाण्याच्या टाक्या धूळ खात पडून आहे, बंद अवस्थेत शौचालयामुळे असं करावा तर असून यामध्ये महिलांना अत्यंत गैरसोयीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक वाचा  राज्यात जिल्हा बँक : भाजपला मोठा झटका तर मविआ चे वर्चस्व