महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका शासकीय नियमावली प्रमाणे काम करत असताना पुणे महापालिका मात्र अजब पद्धतीने भाजपची पक्षनिष्ठा निभावत या सर्रासपणे महापालिका अधिनियमांची पायमल्ली करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आज सकाळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन भाजपच्या कट्ट्याचे विविध ठिकाणचे फोटो टाकून पोस्टर बनवून त्याच्यावरती आयुक्त साहेब मनस्वी धन्यवाद कारवाई कधी? असे पोस्टर देऊन पोस्टर देऊन प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समितीचे उपाध्यक्ष केदार मारणे, गजानन कड, धनराज बनपट्टे,सागर फाटक, रोहिदास जाधव उपस्थित होते.

अधिक वाचा  राज्यात जिल्हा बँक : भाजपला मोठा झटका तर मविआ चे वर्चस्व

पुणे महानगर पालिकेला निधी शासकीय अनुदान स्थानिक नागरिकांचा कर अशा सार्वजनिक स्वरूपातून येत असल्याने या शासकीय निधीचा गैरवापर करण्याचा अधिकार नगरसेवकांना नाही याचे भान नसून महापालिकेच्या नगरसेवकांना मार्फत महापालिकेच्या निधीवरच डल्ला मारण्याचे काम केले जात असून यामध्ये महापालिकेला डावलण्याची काम केले जात आहे. पुणे महापालिका आयुक्त या नात्याने आपण या प्रकरणाची गंभीर दक्षता घेण्याची गरज असतानाही आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून प्रशासकीय प्रमुख म्हणून आपण या सर्व प्रकारा ला आळा घालण्यासाठी सदर निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

पुणे महानगर पालिकेच्या जीवावर सध्या असलेले लोकप्रतिनिधी छत्री, बाके, कचऱ्याचे डबे, हात पिशव्या, अशा असंख्य वस्तूच्या वाटपातून महापालिकेच्या जीवावर आपली “पाटिलकी” सिद्ध करत असताना किमान महापालिकेचा लोगो वापर करत असतात; परंतु अचानक आणि अनावधानाने सत्ता मिळालेल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींना मात्र याचे भान नसून कोथरूड आणि तत्सम शहरभर या पक्षाच्या लोकप्रतिनिधी मार्फत महानगरपालिकेच्या निधीचा वापर करून आपल्या नावांची व पक्षाच्या चिन्हाची प्रसिद्धी करण्यासाठी महापालिकेच्या निधीचा गैरवापर केला जात असून प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. या सर्व पोस्टर बॉईज वरती कारवाई करण्यात आली नाही तर पुणे महापालिका आयुक्त व सर्व सन्माननीय पोस्टर बॉईज च्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही केदार मारणे यांनी दिला आहे.