पुणे – येथील ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू असून सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी ओशो फॉरेव्हरंचे अध्यक्ष व चित्रपट लेखक कमलेश पांडे यांनी केली आहे.

ओशोंचा वारसा वाचविण्यासाठी संपूर्ण भारतभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जगभरातील ओशोप्रेमींना यांचे पुणे येथील ओशो आश्रम पुन्हा परत प्राप्त होण्यासाठी संघर्ष करावा. ओशोंचा वारसा हा केवळ भारताचा वारसा नसून संपूर्ण जगाचा वारसा आहे. ओशोंनी भारताच्या हजारो वर्षे जुन्या असलेल्या अध्यात्मिक परंपरेला पुनर्जीवन देण्याचे काम केले असून ओशोंची समाधी ओशो सन्यासी व ओशो प्रेमींसाठी काशी किंवा मक्का मदीना एवढीच प्रिय आहे. आम्हाला ओशो समाधीपर्यंत जाण्यास बंदी करुन आमच्या धार्मिक अधिकारांपासून वंचित केलेले आहे. ओशोंचा फोटो काढून, त्यांच्या वक्तव्याला काटून छाटून मनमानी पद्धतीने जनतेसमोर सादर केले जात आहे. ओशोना एक रहस्यदर्शी सद्गुरु न मानता त्यांना केवळ एका लेखकाच्या स्वरूपात सादर केले जात आहे. हे कारस्थान यासाठी रचले जात आहे कि, येणाऱ्या पिढीने त्यांना विसरून जावे. ओशोंची जगभरातील वेगवेगळ्या ६० ते ७० भाषांमध्ये अनुवादित झालेली ग्रंथसंपदा या सर्वाची रॉयल्टी कुठे जात आहे? याची चौकशी व्हावयास हवी. आमची मागणी केवळ ओशोंचा आश्रम विकण्यापासून वाचविण्याची नसून या सर्व प्रकाराची सी.बी.आय व इ.डी.मार्फत सखोल चौकशी व्हावयास हवी अशी मागणी कमलेश पांडे यांनी केली. ओशो फाउंडेशन इंटरनॅशनल आणि नवसंन्यास (रजनीश) फाउंडेशनचे ट्रस्टी आणि वर्तमान प्रबंधन टीम द्वारे १८०० कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. या कागदपत्रांची तपासणी आपण वेबसाईटवर सुद्धा करू शकता असे पांडे यांनी म्हटले आहे

अधिक वाचा  विजय शिवतारेंनी पुन्हा बैठक बोलावली, मोठी घोषणा करण्याची शक्यता?

पत्रकार परिषदेला प्रमुख उपस्थिती:स्वामी गोपाळभारती (प्रवक्ता-ओशो फॉरेव्हर तसेच गीतकार),ओमप्रकाश पांडे ( ओशो फॉरेव्हर),स्वामी झोरबा (ओशो संन्यासी)मा ध्यान साधना ,मा अग्नी (संन्यासी),स्वामी प्रेम उत्थान(संन्यासी),मा बोधी प्रतिमा ,स्वामी ओम प्रकाश भारती, स्वामी प्रेम अक्षय ,विठ्ठल कदम (समन्वयक)