पुण्यातील Indian Herpetological Society katraj, पुणे यांचे कडे असलेली ५५ दुर्मिळ प्रजातीची कासवे (Spotted River Terrapin ) तसेच Resque Charitable Trust बावधन, पुणे यांचेकडे असलेली ०८ दुर्मिळ प्रजातीची कासवे पुणे वनविभागामार्फत आसाम मधील गुवाहाटी या ठिकाणी त्यांच्या मूळ अधिवासात सोडली आहेत. या कासवांची संपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून तसेच वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ४८ (अ) नुसार या दोन्ही हि संस्थेकडून सर्व अटी व शर्थीचे पूर्तता करून अशी एकूण ५५+०८= ६३ दुर्मिळ प्रजातीची कासवे आसाम येथील गुवाहाटी मध्ये त्यांच्या मूळ अधिवासात सोडली आहेत. कासवांच्या प्रजाती अनुक्रमे Indian Roof Turtle, Crowned River Turtle, Brown Roof Turtle, Spotted River Terrapin अशा आहेत. त्यापैकी अनेक वन्यजीव संरक्षक कायदा १९७२ अंतर्गत अनुसूचीत १ संरक्षित आहेत.

अधिक वाचा  कतरिनाच्या नात्याला नवी ओळख...; 'NO' मोबाईल महत्त्वाचा नियम

“कासवे पुण्यातून १२ ऑगस्ट २०२१ रोजी हवाईमार्गे गुवाहाटीला नेली जातील जिथे त्यांना Turtle Survival Alliance आणि आसाम वन विभागाचे सदस्य ताब्यात घेतील. आसाम वन विभागाने या प्रजातींना त्यांच्या प्रदेशात वितरणाची पुष्टी केली आहे आणि ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्याची खात्री घेतील.” असे कासवा सारख्या दुर्मिळ होत चाललेल्या वन्यजीवाला हवाई मार्गे त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्याची वनविभागाची हि पहिलीच वेळ आहे. . त्याचबरोबर पुणे वन विभागाचा हा आगळा-वेगळा उपक्रम आहे असे प्रतिपादन पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. राहुल पाटील (भा.व.से.) यांनी केले.

या कासवांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी विवेक खांडेकर,(भा.व.से.), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, सुजय दोडल, (भा.व.से.), मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे व तसेच राहुल पाटील, (भा.व.से.) उपवनसंरक्षक, पुणे यांच्या मार्गदर्शन लाभले. तसेच पुणे वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, Turtle Survival Alliance या आंतराष्ट्रीय संस्थेचे तसेच Assam State Zoo Chairman Indian Herpetological Society, Rescue Charitable Trust, Bavdhan, Pune यांचे संयुक्त रित्या सहकार्य लाभले.