पुणे : दिनांक १० ऑगस्ट रोजी 4k फिल्म्स प्रॉडक्शन आणि एमएन तातुसकर क्रीएटिव्ह मीडिया प्रॉडक्शन निर्मित ” झाबंड ” या लघुपटाचा प्रीमियर शो पुण्यातील सुप्रसिद्ध डॉन स्टुडिओ येथे पार पडला. या प्रीमियर शो च्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री मेघराजराजे भोसले. कोथरूडच्या माजी आमदार आणि भाजपा महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमती. मेधाताई कुलकर्णी व महाराष्ट्र काऊन्सील आणि इंडियन मेडिकल काऊन्सल च्या एक्झिकेटिव्ह मेंबर श्रीमती. अनुपमा शिंपी या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

हा लघुपट पाहून, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. मेघराजराजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी बोलत असताना ते म्हणाले. ” झाबंड ” या लघुपटाद्वारे दिग्दर्शक धनेश कुलकर्णी या युवा दिग्दर्शकाने एका अतिशय संवेदनशील सामाजिक विषयाला हात घातला असून, लघुपटाची मांडणी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. लेखक प्रेम सावंत आणि दिग्दर्शक धनेश कुलकर्णी ही जोडगोळी आणि मयुर तातुसकर हे लघुपटाद्वारे सामाजिक प्रश्नाबद्दलची संवेदनशीलता प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात चांगल्या पद्धतीने यशस्वी झाले आहेत.

अधिक वाचा  अनिल अंबानी अडचणीत? रिझर्व बँकेने सुरू केली कायदेशीर प्रक्रिया

तर याच वेळी बोलताना श्रीमती. अनुपमा शिंपी म्हणाल्या, केवळ चार दिवसाचा रोजगार बुडतो म्हणून ऊसतोड कामगार महिला आपलं गर्भाशय काढून टाकत आहेत हा विषयच फार गंभीर आहे. आपल्या आजूबाजूला या भयानक घटना घडत आहेत ही केवढी मोठी शोकांतिका आहे. ” झाबंड ” या लघुपटात हा विषय अतिशय अभ्यासपूर्ण आणि नेमक्या पद्धतीने मांडला आहे. कथा आणि पटकथा फारच सुंदर असून ती दिग्दर्शकाने पडदयावर छान रंगवली आहे. छायांकन ही अतिशय सुरेख केले आहे. या लघुपटात भूमिका केलेल्या सर्वच कलाकारांचा अभिनय थेट काळजाला भिडतो त्यामुळे प्रेक्षक जागीच खिळून राहतो आणि या लघुपटाचा विषय थेट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. या लघुपटात एका ऊसतोड मजूर कुटुंबाची कथा दाखवण्यात आली असून. त्यांच्या जगण्याची परवड, रोजच अवेळी असलेलं त्यांचं सर्व रुटीन, तान्ह्या बाळापासून होणारे सर्वांचे हाल, छोट्याश्या खोपटात थाटलेला त्यांचा संसार,गाव सोडून परमुलखात आलेली ही माणसं जगण्यासाठी किती भयंकर यातना भोगत आहेत हे सगळं ” झाबंड ” या लघुपटातून मांडण्यात आलं आहे.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला

या लघुपटात मुख्य भूमिका महेश पाटील ( एम, एस. महेश ) , श्रद्धा संजय गायकवाड , आण्णा लोंढे यांच्या असून सहाय्यक कलाकार म्हणून मनोज चौधरी, अमृता चिदरी आणि माउली पुराणे हे आहेत. या लघुपटाचे दिग्दर्शन धनेश कुलकर्णी यांनी केले आहे याचे कथानक प्रेम सावंत हे असून निर्माते म्हणून धनेश कुलकर्णी, मयूर तातुसकर, प्रेम सावंत आणि प्रविण वाघमारे हे आहेत या प्रीमियर शो ला लिझा फूड्स चे डायरेक्टर मा. श्री. अमित चिंचणकर, मुकुंद अयाचित, यशवंत कांबळे, समीर आठले, अभिजीत गायकवाड, मंगेश वाघ, प्रभावती शेकोकर, हनुमंत इंचुरे आणि डॉन स्टुडिओचे ओनर हेमंत गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते.