शंभूराजे प्रतिष्ठाण मांडवण फराटा यांच्या विद्यमानाने १५ आँगस्ट 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दरवर्षी मांडवगण फराटा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे रक्तदान शिबीर आयोजित केले असून परिसरातील नागरिकांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकामार्फत केले आहे.

दरवर्षी या शिबीरामध्ये १५० ते २०० रक्तबँग संकलन होत असतात. शंभूराजे प्रतिष्ठाण हे दरवर्षी रक्तदानासारखा सुद्य उपक्रम आयोजित करून ते या शिबीराच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना रक्तबँगही मोफत देतात. भारतीय देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन असल्याने या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शंभुराजे प्रतिष्ठान च्या वतीने एक अनोखा संकल्प करण्यात आला असून 750 रक्ताचे संकलन करण्याचा दृढनिश्चय करण्यात आला असून यामध्ये सर्वांच्या सहभागाची अपेक्षा असल्याचे संयोजक समितीचे सदस्य व प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मनोहर फराटे यांनी सांगितले.

अधिक वाचा  Omicron व्हेरियंट पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

कोरोनासारख्या रोगराईत देखील या प्रतिष्ठानने अनेक रुग्णांना प्लाझ्माची गरज असणाऱ्या पेशंटला प्लाझ्मा मिळवून देण्याचे काम केले. वेळोवेळी परिसरात हे प्रतिष्ठाण वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते. असे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मनोहर फराटे यांनी सांगितले. तसेच परिसरातील तरुण युवकांना १५ आँगस्ट २०२१ ला होणाऱ्या रक्तदान शिबीरात भाग घेऊन जास्तीत जास्त रक्तबँग कशा जमवता येतील असे आवाहन केले.