नवी दिल्ली – भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात ऑगस्ट या दिवशी भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता.

आता हाच सात ऑगस्ट हा दिवस भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाकडून राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. खुद्द नीरजने या निर्णयावर आनंद व्यक्त करतानाच महासंघाला धन्यवादही दिले आहेत.

महासंघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्‍समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नीरजसह सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यावेळी थाळीफेकीतील अव्वल महिला खेळाडू कमलप्रीत कौर आणि माजी धावपटू अंजू बाबी जॉर्ज दिल्लीत सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
याच कार्यक्रमात महासंघाने दरवर्षी सातत्याने भालाफेकीच्या स्पर्धा घेण्यात येतील अशी घोषणाही केली. महासंघाच्या नियोजन समितीने भालाफेक स्पर्धेला आणखी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी देशभरात स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.

अधिक वाचा  सातारा जिल्हा बँक दिग्गजांना धक्का; आमदार शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई यांचा पराभव