कळंब:- (शहर प्रतिनिधी) मंगळवार दि १० आगस्ट रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय पाटील यांचे अध्यक्षते खाली येथील उपजिल्हा रूग्णालयात रूग्ण कल्याण समिती ची बैठक घेण्यात आली. यावेळी पेशंट च्या गैरसोयी दुर करणे संबंधित सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न.या बैठकीत मध्ये विविध विषयांवर चर्चा होउन उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी ऑक्सीजन प्लांट उभा करणे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना साठी समिती स्थापन करून गरजू रुग्णाना फायदा मिळवून देणे.पेशंट व नातेवाईकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी न प च्या माध्यमातून वाटर एटीएम बसवून देणे. पेशंट च्या नातेवाईकांना निवारा उपलब्ध करून देणे. वाहनांसाठी वाहनशेड उभारणे. उपजिल्हा रूग्णालयात कोवीड व्यतिरिक्त इतर रुग्ण तपासणी व उपचार पुर्विप्रमाणे सुरू करणे. विविध पद भरती त्वरित करण्यात येईल असे डॉ पाटील यांनी सांगितले. तसेच रूग्णालयाच्या विस्तारित ईमारतीसाठी मंजूर जागेची हस्तांतरित प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती हर्षद अंबुरे यांनी दिली.

अधिक वाचा  ओमिक्रोन व्हेरिएंटनं चिंतेत वाढ; निर्बंध लागणार ?; पवार हे म्हणाले..

रूग्णांच्या नातेवाईकांना निवारा सोयीसाठी आमदार महोदयांकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी सुशिल तिर्थकर यांनी घेतली.बैठकीच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ रामकृष्ण लोंढे, सुशील तिर्थकर, हर्षद अंबुरे, न प चे संजय हाजगुडे, डॉ सुधीर औटी, हेड्डा, परशुराम कोळी सहभाग घेतला.