केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात नाराजी असल्याची बाबसमोर आली होती. पंकजा मुंडे यांनी सूचक विधान करून आपली नाराजी बोलून सुद्धा दाखवली होती. पण, आज दिल्लीत पंकजा मुंडे आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर एकत्र आले. नवी दिल्लीत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी बैठक आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला भाजपचे लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील भाजपचे अनेक आमदारही उपस्थित आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, राम शिंदे, जयकुमार रावळ, संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळे,मनोज कोटक, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे आदी नेते उपस्थित आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा या बैठकीसाठी दाखल झाले आहे. तर या बैठकीला पंकजा मुंडे सुद्धा पोहोचल्या आहे. या बैठकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहे.

अधिक वाचा  कर्वेनगरला विद्युत रोषणाई उदघाटन सोहळा संपन्न

दरम्यान त्याआधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राज्यातील भाजप कोअर समितीची बैठक पार पडली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सूचनेवरून ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, पंकजा मुंडे तसेच इतर नेते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या दिल्ली दौर्यामध्ये गडकरी यांच्या निवासस्थानी पूर्वी भेट निश्चित नव्हती.पंरतु, जे.पी.नड्डा यांच्या आदेशानंतर ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे कळतेय. कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटी दरम्यान पुरामुळे उध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी केंद्र सरकारच्या वतीने देण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती प्रविण दरेकर यांनी दिली.

अधिक वाचा  ओमिक्रॉन व्हेरिएंट: प्राथमिक शाळा 1 डिसें लाच सुरू होणार- टोपे

महाराष्ट्रात आलेल्या पुरामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची केलेल्या दौर्याची व तेथील पूरस्थितीची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना दिल्याचे दरेकर म्हणाले.

गेल्या दोन दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते दिल्ली दौऱ्यावर आहे. पण पहिल्यांदाच पंकजा मुंडे या नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सहभागी झालेल्या होत्या. राज्यात संघटनात्मक बदलाचे वारे सुरू असून या वाऱ्यांची दिशा निश्चित करण्याकरिता नितीन गडकरी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते.