जुलै महिन्यात वितरकाकडून ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या वाहनात म्हणजे किरकोळ वाहन विक्रीत समाधानकारक वाढ झाली आहे. राज्यातील निर्बंध कमी होत आहेत. त्याचबरोबर ग्राहक आता खरेदीसाठी पुढे येऊ लागल्या आहेत असे वितरकांच्या संघटनेने म्हटले आहे.

वितरकांच्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की जुलै महिन्यामध्ये केवळ प्रवासी वाहन विक्री वाढलेली नाही तर दुचाकी आणि व्यावसायिक वाहन विक्रीतही समाधानकारक वाढ झाली आहे.

एकूण वाहन विक्री 34 टक्‍क्‍यांनी वाढून 15,56,777 युनिट एवढी झाली आहे. गेल्या वर्षी या महिन्यामध्ये केवळ 11,60,721 वाहन विक्री झाली होती. एक तर संपूर्ण देशामध्ये आता निर्बंध कमी करण्यात आले आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी या महिन्यामध्ये वाहनांची विक्री कमी झाली होती. त्यामुळे या वर्षी जुलैमध्ये वाहन विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत असल्याचे गुलाटी म्हणाले.

अधिक वाचा  माझ्या पराभवात 'यांचा' हात ; शशिकांत शिंदे यांचा मोठा आरोप

प्रवासी वाहन विक्रीत 63 टक्‍क्‍यांची वाढ होऊन 2,61,744 युनिट इतकी झाली आहे. वाहन कंपन्यांनी या काळात बरीच नवीन मॉडेल जारी केली आहेत. मात्र सेमीकंडक्‍टर तुटवड्यामुळे या वाहन उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता वितरकांना सतावत आहे. काही प्रवासी वाहनांचा वेटिंग पिरिएड चार महिन्यापर्यंत वाढला आहे.

जुलै महिन्यात दुचाकी विक्री 28 टक्‍क्‍यांनी वाढून 11,32,611 युनिट झाली आहे. आतापर्यंत व्यावसायिक वाहन विक्री थंडावली होती. मात्र जुलै महिन्यामध्ये व्यवसायिक वाहन विक्री दुप्पट वाढवून 52,130 युनिट इतकी झाली आहे. सरकाने पायाभूत सुविधा क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे या क्षेत्रातील विक्री वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  Omicron Variant चा कहर, राज्यात 13 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध - आरोग्यमंत्री

ट्रॅक्‍टर विक्री 7 टक्‍क्‍यांनी वाढून 12,82,388 युनिट एवढी झाली आहे. आता सणासुदीचा काळ सुरू होणार असल्यामुळे आगामी काळामध्ये वाहन विक्री वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र त्या प्रमाणामध्ये वाहनांची उपलब्धता होईल की नाही याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.