ऊरूळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचे खुनाचे गुन्हयातील १० जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. १८ जुलैला रात्री पावणे नऊच्या सुमारास उरुळी कांचन येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांचा खून झाला होता. तपासादरम्यान सदरचा गुन्हा बाळासाहेब खेडेकर यांनी त्यांच्या मालकीचे अशोका हॉटेलचा व्यवसाय वाढविण्याचे उद्देशाने तसेच हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतुन त्यांचा भाचा सौरभ ऊर्फ चिम्या व इतर यांना दररोज एक ते दोन हजार देण्याचे सांगून घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.

अधिक वाचा  काँग्रेस नेत्यांचं प्रत्युत्तर; ममतांसह विरोधकांना हा सल्ला

त्यामुळे या गुन्हयात बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखिल बाळासाहेब खेडेकर ( वय-२४, दोघे रा. खेडेकरमळा, उरुळी कांचन, ता. हवेली ) सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी ( वय २१, रा. अशोका हॉटेलचे पाठीमागे, खेडेकरमळा उरुळी कांचन ) अक्षय अविनाश दाभाडे ( वय २७, रा. सोरतापवाडी, ता. हवेली ), करण विजय खडसे ( वय २१, रा. माकडवस्ती, सहजपुर, ता. दौड ) प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय २३ वर्ष, रा कॅनरा बँकेचे मागे शिंदावणे रोड, उरुळी कांचन ), गणेश मधुकर माने ( वय २० ), निखिल मंगेश चौधरी ( वय २०, दोघे रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली ) निलेश मधुकर आरते ( वय २३, रा. गल्ली नं.५, तुकाईदर्शन, हडपसर, पुणे ) व काजल चंद्रकांत कोकणे ( वय-१९, रा. घर नं. ए/०६ इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे ) यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिक वाचा  Omicron Variant ची ही लक्षणं!; डेल्टा पेक्षा ओमायक्रोन हा फरक

लोणी काळभोर पोलीस स्टेशन हददीत या गुन्हयातील आरोपी हे टोळी वर्चस्व आणि आर्थिक फायदयासाठी संघटित गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयातील आरोपी निलेश आरते हा हडपसर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच इतरांवर यापुर्वी जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, जबरी चोरी करणे, हत्यार व अग्निशस्त्रे जवळ बाळगणे असे विविध प्रकारचे हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे एकूण २१ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग कल्याणराव विधाते, हे करीत आहेत. सदरची उल्लेखनिय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संदीप धनवटे, गणेश भापकर यांचे पथकाने केली आहे.