नवी दिल्ली – राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाच्या अंतर्गत भारताला खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-पाम तेलाच्या माध्यमातून स्वयंपाकाच्या तेलाच्या संपूर्ण व्यवस्थेत 11000 कोटी रुपये गुंतवले जातील.

शेतकऱ्यांना सर्व सुविधा, उत्तम दर्जाची बियाणे आणि तंत्रज्ञान मिळेल, याची सरकार पूर्ण काळजी घेईल. ही माहीती पहतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याशी संवाद साधतांना दिली. करोनाच्या काळात भारतीय शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र काही पिकांच्या बाबतीत आपण मागे पडलो आहोत. खाद्यातेलाचे देशात उत्पादन वाढले तर त्यामुळे परकीय चलन वाढण्यास मदत होणार आहे.

अधिक वाचा  संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; धक्कादायक निर्णय

भारत पाहिल्यांदाच कृषी निर्यात क्षेत्रात जगातील पहिल्या दहा देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. कोरोनाच्या काळात, देशाने कृषी निर्यातीचे नवे विक्रम प्रस्थापित केले. आज ज्यावेळी आपला देश जगात कृषी निर्यात क्षेत्रात एक मोठा निर्यातदायर म्हणून ओळखला जातो आहे, अशा वेळी, आपण खाद्यतेलाच्या बाबतीत आयातीवर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही.

शेतकऱ्यांना येत्या काळात देशातील कृषि पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधांचा लाभ मिळेल. त्याशिवाय, फूड पार्क, किसान रेल, आणि पायाभूत निधी चाही छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल. गेल्या वर्षी या पायाभूत निधी अंतर्गत, सहा हजार पेक्षा अधिक प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. या सर्व पावलांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ सहज उपलब्ध होईल आणि कृषी उत्पादक संघटनांमुळे त्यांची धान्याची किंमत ठरवण्याची, सौदा करण्याची क्षमता वाढेल.