पुणे : कोरोना काळात अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले, कुटुंबीय दुर्लक्ष करत असताना डॉक्टरांनी देवदूत बनून काम केले, आधार हॉस्पिटलच्या वैदकीय पथकाने रुग्णांची सेवा करून नागरिकांना आजार व भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या सुविद्य पत्नी संध्याताई टिळेकर यांनी केले.

हंडेवाडी, काळेपडळ, महंमदवाडी भागातील रुग्णांसाठी आधार हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. उदघाटन संध्याताई योगेश टिळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संजय सातव, हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.मंगेश वाघ, पोपट वाडकर, हनुमंत घुले, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ.अमोल महाजन, डॉ.अपूर्वा महाजन, डॉ.अतुल चोपडा, शोभा लगड, स्मिता गायकवाड, आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  "अशा ठिकाणी कशाला जायचं?" फडणवीसांचा साहित्य संमेलनाला जायला नकार

याप्रसंगी आधार हॉस्पिटलच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ.ज्ञानेश्वर पुके, डॉ.नारायण सावंत, डॉ.प्रीती सावंत यांनी केले.
सूत्रसंचालन महेश टेळेपाटील यांनी केले. प्रस्ताविक आणि आभार डॉ.ज्ञानेश्वर पुखे यांनी मानले.