नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीये. त्यामुळेच त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केली आहे.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला. ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीये. त्यामुळे त्यांनी 50 टक्के मर्यादेचं नवं कारण शोधलं आहे. इंदिरा सहानी केसमध्ये अतिशय क्लिअरपणे यावर भाष्य केलं आहे. सध्या मुद्दा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा नाहीये. तर मुद्दा मागास घोषित करण्याचा आहे. एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचं हा नंतरचा भाग आहे. अजून मागासच घोषित केलं नाही, मग आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल करतानाच आतापर्यंत जातींना मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं जात होत. आता राज्यांना अधिकार मिळतोय. त्यामुळे सरकारने कारवाई करावी, असं ते म्हणाले. नवनवीन मुद्दे काढून सरकार वेळकाढूपणा करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

अधिक वाचा  ४ डिसेंबरला का साजरा केला जातो? भारतीय नौदल दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

विरोधकांनी सहकार्य करावं

राज्याचे अधिकार राज्याकडेच राहतील अशी आमची मागणी होती याबद्दल आज अमित शहा यांची भेट घेतली. आज 127 व्या घटना दुरूस्तीच महत्वाच विधेयक मांडलं जाणार आहे. हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्याची विनंती शहांना केली. परंतु विरोधकांनी सध्या लॉकजाम सुरू केला आहे. ते कामकाज होऊ देत नाही. किमान या बिला करीता तरी कामकाज होऊ द्यावं. ओबीसी आणि मराठा समाजासाठीचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला तात्काळ मान्यात दिली पाहिजे, असं ते म्हणाले. शहांसोबत इतर विषयांवरही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  कुसुमाग्रज निवासस्थानापासून वाजत गाजत ग्रंथदिंडी; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही

चंद्रकांत पाटील शनिवारपासून दिल्लीत आहेत. काल त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले होते. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.