पुणे : पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार तर हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.करोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली सोमवारी जाहीर केली आहे.पुणे जिल्हाचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळाला असताना मात्र पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम होते. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होते. या निर्णयावर पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा जनआधार संघटना संस्थापक कृष्णा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विरोधात आणि लॉकडाऊन संदर्भात गेली दोन वर्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येत होते.कृष्णा गायकवाड यांनी लॉकडाऊन विरोधात विविध सामाजिक संघटना आणि समविचारी नागरिकांना एकत्र करून जनआधार संघटनेच्यावतीने जन आंदोलन सुरू केले आहे.करोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली सोमवारी जाहीर झाल्याने कृष्णा गायकवाड यांच्या लढ्याला यश आले आहे.

अधिक वाचा  भाजपवाल्यांच्या माझ्याकडे सीडी, लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : मलिक

यापूर्वीही त्यांनी लॉकडाऊन हटविण्यात यावा या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत पत्रव्यवहार केला होता. परंतु, लॉकडाऊन हटविण्याची त्यांची मागणी गांभीर्याने घेतली गेली नसल्याने आंदोलनाचा पवित्रा कृष्णा गायकवाड यांनी घेतला होता. पुण्यातील सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची अनलॉकबाबतची नवी नियमावलीचे कृष्णा गायकवाड यांनी स्वागत करून राज्य सरकारचे आभार व्यक्त केले.परंतु,कोरोना ही महामारी नसून तो साधा आजार आहे असतानाही भविष्यात संभाव्य लाट निर्माण करून पुन्हा लॉकडाऊन चा निर्णय घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमधील नागरिकांसह व्यापारी, कष्टकरी, कामगार, उद्योग व्यवसाय नागरिकांच्या साथीने जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

अधिक वाचा  भारत - दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI कडून आली मोठी अपडेट

पुणे शहराची अनलॉकबाबतची नवी नियमावली

– पुण्यातील हॉटेल-रेस्तराँ सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार

– मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

– मॉल्समध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार

– हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक

– पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार

– जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी

– सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लागणार

– पुणेकरांना मास्क वापरणं बंधनकारक