नवी दिल्ली : देशात जास्तीत जास्त कोरोना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 18+ नागरिकांना लस दिली जाते आहे. अशात आता कोरोना लसीकरणात मोठा बदल होणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत आहे.

सध्या देशात  पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची कोविशिल्ड, हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक V. या तिन्ही लशींचे दोन डोस घेणं गरजेचं आहे आणि त्या दोन डोसमध्ये विशिष्ट अंतर आहे. पहिला डोस घेल्यानंतर या विशिष्ट कालावधीनंतर दुसरा डोस घेता येतो. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सध्या 12 ते 18 आठवडे आहे. पण ते आता पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  ओमिक्रोन व्हेरिएंटनं चिंतेत वाढ; निर्बंध लागणार ?; पवार हे म्हणाले..

केंद्र सरकार आता कोविशिल्ड कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या तयारीत आहेत. पण हे अंतर फक्त 45 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी असेल.

याबाबत दोन ते चार आठवड्यात निर्णय घेतला जाऊ शकतो. वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असं कोव्हिड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितल्याचं वृत्त द मिंटने दिलं आहे.

कोरोना लसीकरण सुरू झालं तेव्हा कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंंतर 4 ते 6 आठवडे होते. त्यानंतर ते वाढवून 4 ते 8 आठवडे आणि पुन्हा 12 ते 16 आठवडे  करण्यात आलं. हे अंतर वाढवण्यावरून वादही झाला होता. लसीकरणाबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. पण आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा तज्ज्ञांनी केला.

अधिक वाचा  डीएसकेंचा चावा खरंच आमदाराने कारागृहात घेतला?; व्हायरल वर अधीक्षक हे म्हणाल्या…

या लशीच्या दोन डोसमधील अंतर जास्त असल्यास शरीरात जास्त अँटिबॉडीज तयार होतात, असं या संशोधनात दिसून आलं होतं. लशीचे चांगले परिणाम मिळावेत म्हणून भारतातही दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं होतं.

जूनमध्ये जेव्हा भारतात दोन डोसमधील अंतर वाढवलं गेलं तेव्हा पहिल्या डोसमुळे जास्त अँटिबॉडी दिसून आल्या आणि त्यानंतर त्या घटत गेल्याचं दिसून आलं. दोन डोसमधील अंतर घटल्यानंतर असं अनेक देशांमध्ये दिसून आलं. लसीकरणाची स्थिती बदलणार आहे आणि नव्या अभ्यासानुसार यामध्ये बदल होत येणार.