हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या कलाकृतींचा “धागा हॅन्डलूम महोत्सवाचे” आयोजन येत्या ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणा, कर्वे रोड येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. विणकर कला आणि कलाकार यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय हातमाग दिवसाचे (7 ऑगस्ट) औचित्य साधून हा उपक्रम केल्याची माहिती मेधा कुलकर्णी उपाध्यक्ष राष्ट्रीय महिला मोर्चा भाजपा व मा आमदार यांनी दिली.

या प्रसंगी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, उषा ताई काकडे , विकास पासलकर (अध्यक्ष , पुणे जि . खा . ग्रा . सं .) ध्रुवकुमार बनसोडे ( प्र . जि . ग्रा . अधिकारी ), संजय कदम ( सहाअयुक्त , ग्रामोद्योग )पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड मॅडम , विकास पासलकर (अध्यक्ष , पुणे जि . खा . ग्रा . सं .) ध्रुवकुमार बनसोडे ( प्र . जि . ग्रा . अधिकारी ), अरुणाताई ढेरे, मा. आ . माधुरीताई मिसाळ ,मा .आ. मुक्ता टिळक, उमाताई खापरे, अर्चना पाटील, संजय कदम ( सहाअयुक्त , ग्रामोद्योग ), अंकिता हर्षवर्धन पाटील, सुषमा चोरडिया, डॉ. आरती निमकर, गिरिजा ताई बापट, स्वरदाताई बापट असे अनेक मान्यवर या महोत्सवाला हजेरी लावतील.

अधिक वाचा  संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; धक्कादायक निर्णय

या महोत्सवात हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या कलाकृती यामध्ये विविध प्रकारच्या सिल्क आणि कॉटनच्या साड्या, कुर्ते, पर्स, जॅकेट, विविध प्रकारच्या वस्तू, handloom fabric पर्स, चप्पल , खेळणी असणार आहेत.

हा महोत्सव ५ व ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा पुणेकरांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. ६ तारखेला सकाळी ११ वा फॅशन शोचे आयोजन केले आहे. अशी माहिती या महोत्सवाच्या आयोजक प्राचार्य मेधा कुलकर्णी यांनी दिली