नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ‘ई-रुपी’ या डिजिटल पेमेंट सेवेचे उद्घाटन झाले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी विकसित केलेले ‘ई-रुपी’ हे प्रीपेड व्हाऊचर आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय लाभार्थ्यांच्या खात्यात केंद्रीय योजनांचे लाभ जमा व्हावेत, यासाठी ही पेमेंट सेवा अधिक पारदर्शकपणे काम करेल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

डिजिटल सुशासनाला आज एक नवा आयाम मिळाला आहे. डिजिटल व्यवहारांबरोबरच केंद्राच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आर्थिक लाभ थेट मिळण्याची प्रक्रिया आता अधिक परिणामकारक आणि सुटसुटीत होणार आहे. ‘ई-रुपी’ ही एक पारदर्शक पेमेंट सेवा आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अधिक वाचा  सरस्वतीच्या ठेकेदारांवर शाई फेकल्याचा एवढा तांडव होणार तर सावित्रीवर शेण फेकल्याचा बदला तिचेच लेक घेणार. - प्रविण गायकवाड