नवी दिल्ली : कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट  आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका यात आता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने  एक दिलासादायक बातमी दिली आहे. मेड इन कोरोना लस कोवॅक्सिन  कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

कोरोना आपली रूपं बदलतो आहे. त्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटने तर चिंता अधिक वाढवली होती. आगामी तिसऱ्या लाटेत मुख्य भीती ही डेल्टा व्हायरसची आहे. कोरोनाच्या नव्या रूपावर कोरोना लस कितपत प्रभावी ठरेल याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आता चिंता करण्याची गरजच नाही. ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीनंतर आता आयसीएमआरनेसुद्धा ही लस या व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं सांगितलं आहे.  हा भारतीयांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

अधिक वाचा  Omicron Variant चा कहर, राज्यात 13 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध - आरोग्यमंत्री

याआधी भारत बायोटेकने कोवॅक्सिन लस कोरोनाविरोधात कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात 77.8 टक्के आणि कोरोनाच्या व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला होता. तसंच कोरोनाच्या गंभीर प्रकरणात ही लस 93.4 टक्के आणि लक्षणं नसलेल्या कोरोनाविरोधात ही लस 63.6 सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं.

कोव्हॅक्सिन ही लस पूर्णतः भारतीय असून, ती हैदराबाद भारत बायोटेक या कंपनीने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) या संस्थांच्या सहकार्याने विकसित केली आहे.कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष केंद्र सरकारने तीन जानेवारी रोजीच कोव्हॅक्सिन या लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली होती.

अधिक वाचा  सचिन वाझे-परमबीर सिंह भेट; देशमुख यांच्या वकीलांची नाराजी

कोरोनाच्या SARS – CoV-2 या मूळ व्हायरसचे B.1.17 (अल्फा) आणि B.1.617 (डेल्टा) असे दोन व्हेरिएंट सध्या जगभर धुमाकूळ घालत आहेत. या दोन्ही व्हेरिएंटचा शरीरातील प्रभाव कमी करण्यासाठी कोव्हॅक्सिन प्रभावी असल्याचं याआधी अमेरिकेच्या प्रयोगशाळेतही सिद्ध झालं आहे.