आळंदी : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोकण विभाग म्हणजे रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अक्षरशः पावसाने जोरदार हजेरी लावली होती.त्याचा फटका पूर्णतः चिपळूणकरांना  बसला, सर्व काही होत्याच नव्हत झालं.

अन्न वस्त्र निवारा हे सर्व पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना मदत सर्व स्तरावरून होत असताना, पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे गटनेते पांडुरंग वहीले यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी चिपळूण या भागांमध्ये नगरसेवक पांडूरंग वहीले मित्र मंडळाच्या माध्यमातून पाणी बॉटल बॉक्स, आटा, पार्ले बॉक्स, मेडिकल किट, धान्यकिट, चटई,ब्लँकेट, मास्क, सॅनिटायझर बॉटल, साड्या घेऊन चिपळूण येथे रवाना करण्यात आला आहे.

अधिक वाचा  Omicron Variant चा कहर, राज्यात 13 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध - आरोग्यमंत्री

त्यासाठी डाॅ.ताराचंद कराळे, नवनाथ बोडके, संदीप बाणखेले, मयूर भालेराव, सुरेश अभंग आणि वैष्णवी फौंडेशन चे अमित तापकीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.