गुहागर: मागील आठवड्यात चिपळूण येथे आलेल्या विनाशकारी महापूराचे पडसाद आता चिपळूण व परिसरात उमटत आहेत, अतिवृष्टी व महापुराने अक्षरशः सर्वसामान्य जनतेच्या पाठीचा कणा मोडून काढल्यामुळे सामाजिक बांधिलकी व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २४ मुंढर ता. गुहागर तसेच माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त गाव मौजे गोवळकोट, माप, वालोपो या गावातील गोरगरीब गरजूंना अन्नधान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सदर वाटप शाखेचे सचिव अजित गमरे, सहसचिव महेंद्र गमरे, सभासद एएसआई प्रदीप गमरे, दर्शन गमरे, राजेंद्र गमरे, सचिन गमरे, संजय पवार, सुदर्शन गमरे, आदित्य गमरे महिला मंडळ सचिव व विद्यमान उपसरपंच अमिषा गमरे, सरिता गमरे, प्रेरणा गमरे यांच्या उपस्थितीत झाले.

अधिक वाचा  काँग्रेसमध्ये हालचालींना वेग , बड्या नेत्यांना तातडीने बोलवले नागपुरात

योग्य व गरजूंना मदत मिळावी म्हणून सदर गावात प्रत्यक्ष भेट देऊन सर्व वाटप करण्यात आल्याची माहिती संघाच्या कार्यकारणी मंडळाने दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंसोबतच पूरग्रस्त परिवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याना दिलासा दिल्याबद्दल पूरग्रस्त परिवाराने आमच्या वृत्तप्रतिनिधींजवळ बौद्धजन सहकारी संघ व माता रमाई महिला मंडळाला कृतज्ञता व्यक्त केली आहे.