जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. 0-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय महिला हॉकी संघाने ऑलम्पिक स्पर्धेत उलटफेर केला आहे.

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघानी समान खेळ केला. भारत आणि ऑस्टेलिया संघाना गोल करण्यात अपयश आलं. मात्र, पहिला हाप संपण्यापूर्वी भारतीय संघाने आपला खेळ उंचावला. गुरजित कौर हिने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्‍टी कॉर्नरला गोलमध्ये परावर्तित करत भारताला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखण्यात भारतीय संघाला यश आलं. तिसऱ्या क्वार्टरमध्येही ऑस्ट्रेलियाच्या संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला सडेतोड उत्तर देत एकही गोल होऊ दिला नाही. अखेरच्या चौथ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार हल्ले करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय महिला संघाने सर्व हल्ले परतवून लावले.

अधिक वाचा  न्यूझीलंडचा पहिला डाव 62 धावांतच आटोपला; फिरकीसमोर घसरगुंडी