आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील स.नं.१२५/७ ब नगरपरिषद जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नियोजित स्मारक विकसित करण्यात येणार आहे. यासाठी आळंदी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ५१ नुसार स्मारकाचे कामास मान्यता देण्यात आली असल्याने यावर्षीची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट २०२१ ला नियोजित स्मारकाचे जागेत व्हावी अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे खंजिनदार व आळंदी शहर शिवसेना विभाग प्रमुख श्सुरेश नाना झोंबाडे यांनी केली आहे.

या मागणीसाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेचे सचिव सूर्यकांत खुडे, खजिनदार सुरेश नाना झोंबाडे, फौंडेशन चे अध्यक्ष श्री.नानासाहेब साठे यांनी निवेदन देवून नगरपरिषद प्रशासनांचे लक्ष वेधले आहे. यावर्षी साठे जयंती १ ऑगस्ट २०२१ ला सर्वत्र साजरी होत आहे. आळंदीतही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने तसेच विविध संस्था यांचे वतीने साजरी करण्यात येत आहे. यावर्षीची जयंती आळंदी नगरपरिषद हद्दीतील स.नं.१२५/७ ब नगरपरिषद जागेत विकसित होणा-या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नियोजित स्मारक जागेत साजरी करण्याची मागणी सर्व समाज बांधव यांचेकडून करण्यात आली आहे. यासाठी यावर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नियोजित स्मारकाचे जागेत साजरी करण्याची परवानगी मिळावी म्हणून नगरपरिषदेला लेखी मागणीसाठी पत्र दिले असल्याचे झोंबाडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  शिवसेना ‘वंचित’ युतीलाही शिंदे देणार जशास तसे उत्तर, PRP चा हा मोठा नेता येणारं एकत्र

कोरोंना महामारीचे काळातील शासन आदेश, सूचना यांचे पालन करीत सामाजिक अंतराचे तसेच सुरक्षा विषयक नियमांचे पालन करून जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंती स्मारकाचे जागेत साजरी करण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे. या जयंतीचे कार्यक्रमास आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचेसह पदाधिकारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहण्यास कळविण्यात आले असल्याचे संस्थेचे सचिव सूर्यकांत खुडे यांनी सांगितले आहे. नियोजित स्मारकाच्या जागेतील राडारोडा, दगडमाती, इतर लाकडी साहित्य हलवून जागेची साफ सफाई करून जागा वापरस योग्य, रिकामी करून देण्याची मागणी देखील निवेदांनातून करण्यात आली आहे.