बावधन बु. येथे ग्रामपंचायत असताना संपूर्ण गावचा कचरा मोफत उचलला जात होता बावधन बु. हे गाव आता पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर बावधनकर नागरिकांना मात्र महापालिकेच्या सोयी-सुविधा घेण्यापेक्षा त्यांच्या त्रासाचा सामना करावा लागत असून बावधन ग्रामपंचायतीच्या भागांमध्ये स्वच्छ चे कर्मचारी घरोघरी जाऊन सामान्य नागरिकांना कचऱ्याच्या नावाने त्रास देत असून हे अत्यंत निंदनीय असल्याचे बावधन गावचे विद्यमान सरपंच पियुषाताई किरण दगडे यांनी सहायक आयुक्त कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका यांना लेखी पत्राद्वारे कळविले असून बावधन बु. येथील कचरा प्रश्न सोडवण्याची विनंती केली आहे.

अधिक वाचा  समुद्रपातळीत तिप्पट वाढ; या देशाचे अस्तित्वच धोक्यात; पाण्यातूनच जगाला आवाहन

बावधन ग्रामपंचायतींमध्ये सध्या घरोघरी जाऊन स्वच्छ संस्था कचरा उचलण्यासाठी नागरीकांना बळजबरी करत आहेत. आमचा सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे सर्व नागरिक टॅक्स भरत असताना त्यांच्याकडून सुविधाचे पैसे घेणे कितपत योग्य आहे आणि स्वच्छ कंपनीला आमचा पुर्णपणे विरोध आहे. सध्या ग्रामस्थाची दिशाभूल करण्याचे काम शेजारील भागातील लोकप्रतिनिधी हेतुतः करत आहे. यामध्ये पुणे महापालिका सदस्य हि ग्रामपंचायत कचरा संकलन व्यवस्था बाधित करण्याचे काम करत आहेत. पुणे महापालिकेच्या वतीने हा बावधन वासियांना नाहक त्रास आहे. ज्यांना कुणाला स्वच्छ कंपनी मार्फत कचरा उचलायचा आहे त्यांनी त्यांच्याच भागात नेऊन उचलावा. तरी आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जसा ग्रामपंचायत मार्फत पहिला जसा मोफत कचरा उचलला जात होता तसाच आता पण पुणे म.न.पा. मार्फ़त मोफत कचरा उचलला जावा .

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

बावधन ग्रामपंचायतीत ५ टेम्पो असून वर्षानुवर्षे कचरा विघटन केले जात होते. यासाठी स्वतंत्र यंत्रणा (कर्मचाऱ्यासहित) असून ती पूर्ववत सुरु करण्यवात यावी. स्वच्छ संस्थेचा कचरा संकलन करण्यास जो आपला निधी व्यय होत आहे . तेवढ्याच निधीत हि यंत्रणा कार्यान्वित होणे शक्य आहे. तरी हा कचरा संकलन पूर्ववत ठेवावे. आज बावधनवासियांना पुणे महापालिकेच्या वतीने कोणतीही सोयी-सुविधा नाहीत, पथदिवे देखील अनेक दिवसापासून बंद असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक यांना नाहक त्रास आहे. पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त असताना ‘स्वच्छ’ चे कर्मचारी घरोघरी जात आहेत यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. सध्या नागरिकांचा रोष वाढत आहे .अन्यथा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठे आंदोलन उभारून स्वच्छ कंपनीला हुसकावून लावण्यात येईल याची नोंद घ्यावी.