आळंदी :‌ भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी आळंदी येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि ओबीसी समाजाचे नेते ज्ञानेश्वर बनसोडे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा आळंदी शहर अध्यक्ष पदी फेरनियुक्ती केली.

यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार योगेश टिळेकर, आमदार भिमराव तापकीर, पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सत्यवान भुमकर आदी उपस्थित होते.

योगेश टिळेकर यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात ही जबाबदारी पार पाडत असताना आपण आपल्या संघटन कौशल्याने आळंदी आणि परिसरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे, ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच ओबीसी समाज जास्तीत जास्त भाजपामध्ये सामील होण्यासाठी आपण परिश्रम कराल असा आत्मविश्वास व्यक्त करून संघटन कौशल्य अशी जबाबदारी देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  वडिलांना पुढे करत स्वार्थापोटी नगरसेविकेच्या पतीकडून नामांकित बिल्डर विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

ज्ञानेश्वर बनसोडे हे सच्चे समाजसेवक आहेत त्यांनी आज पर्यंत आपल्या सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांना ओबीसी घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. या त्यांच्या कार्याची दखल भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार टिळेकर यांनी घेऊन त्यांना यापुढच्या काळात ओबीसी समाजाला न्याय देता यावा यासाठी आळंदी शहर अध्यक्षपदी काम करण्याची मोठी संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आहे. ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या निवडीचे आळंदी व जिल्ह्यात सर्वत्र स्वागत होत आहे.

आळंदी शहर ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या बरोबर ओबीसी मोर्चा शहर उपाध्यक्ष पदी रितेश पांचाळ, संपर्कप्रमुख रोहन आढाव, सरचिटणीस स्वप्निल पलसकर पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.