पुणे : मेट्रो कोणामुळे रखडली, यावरून आतापर्यंत एकमेकांवर चिखलफे क करणाऱ्या राजकीय पक्षांनी चाचणी यशस्वी झाल्यानंतर राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू के ली आहे. पुणेकरांना दिलेल्या आश्वासनाची भाजपने पूर्तता के ली आहे, असा दावा भाजपने के ला आहे. अजित पवार यांच्या बळावरच मेट्रो रुळावर आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितले जात आहे, तर काँग्रेसच्या सत्ताकाळात मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली, असा दावा काँग्रेसने के ला आहे.

वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यातील मेट्रोची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. सन २००७ मध्ये महापालिके ने मेट्रोच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर मेट्रोचा प्रवास अडकला. मेट्रोचा प्रस्ताव मान्य करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली होती. मात्र राजकीय वादातून हा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. चार वर्षांपूर्वी पुण्यातील मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले आणि त्यानंतर पुढील तीन वर्षांत मेट्रोचे काम पुणेकरांना प्रत्यक्ष दिसले. तीन वर्षांत मेट्रोचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाला आपल्याच सत्ताकाळात आणि आपल्याच नेत्यांमुळे गती मिळाली, असा दावा राजकीय पक्षांकडून सुरू झाला आहे.

अधिक वाचा  नागपूर अधिवेशनाचे वावडे का?; नागपूर कराराचे उल्लंघन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याबरोबरच राज्यातील अन्य मेट्रो प्रकल्पांना गती दिली. निवडणुकीपूर्वी मेट्रो प्रवासाचे आश्वासन भाजपने दिले होते. त्याची पूर्तता झाली आहे, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी के ला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही दूरसंवाद चित्रफितीद्वारे संवाद साधताना फडणवीस यांना मेट्रोचे श्रेय दिले.

दरम्यान, अजित पवार यांच्यामुळेच मेट्रोला गती मिळाली आहे. भाजपच्या वाचाळवीरांनी फुकटचे श्रेय घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातच मेट्रोचा प्रस्ताव मंजूर झाला. शरद पवार यांनी के ंद्राकडून हा विषय मंजूर करून घेतला. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर राजकारण करून मान्य प्रस्ताव रखडविण्यात आला, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. मेट्रोची चाचणी यशस्वी झाली ही काँग्रेसची स्वप्नपूर्ती आहे, असा दावा मोहन जोशी यांनी

अधिक वाचा  आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात.

के ला. राज्यातील, केंद्रातील काँग्रेस नेत्यांनी सातत्याने त्यासाठी पाठपुरावा के ला. काँग्रेसने मेट्रोचा ठराव महापालिके त मंजूर करून घेतला. मेट्रोची परवानगी आणि अन्य किचकट प्रक्रिया काँग्रेसच्या सत्ताकाळात पूर्ण करण्यात आल्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला गती दिली, असे जोशी यांनी स्पष्ट केले.

पुण्यात मेट्रोचे जाळे वाढवणार

आत्तापर्यंत 7 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. काम जिकिरीचं आहे. महापालिकेने पुढाकार घ्यावा असं म्हणत पिंपरी चिंचवड ते दापोडी ऑक्टोबर 2021 मध्ये तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  घेरा सिंहगड गरिबांच्या संसारांवर वन विभागाचा हातोडा; धनदांडग्यांना अभय

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्ग हा दोन्ही बाजूंना वाढवून निगडी ते कात्रज करण्याचा प्रयत्न असून तसंच वनाझ ते रामवाडी मार्ग दोन्ही बाजूनी वाढवून चांदणी चौक ते वाघोली करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणालेत. पुण्यात मेट्रोचे जाळे वाढवणार असून हडपसर भागातही मेट्रो नेण्याचा प्रयत्न आहे, असं अजित पवार यांनी आज म्हटलं आहे.

पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला कालच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. पुण्याचा विकासाच आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे. काल मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत पीएमआरडीएची बैठक झाली. PMRDA अंतर्गत विविध प्रकल्प राबवायला 75 हजार कोटींचा निधी लागणार असून क्षेत्रफळाच्या नुसार PMRDA राज्यात सर्वात मोठं तर देशात क्रमांक 3 वर असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.