मदत नव्हे कर्तव्य…..  हाकेला-हाक… साथीला साथ… देण्याच्या भूमिकेतून पुणे शहरातील युवासेना कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे सहसचिव युवा सेना किरण साळी यांच्या बरोबर कोकणवासीयांच्या मदतीला जाण्याचा निर्धार करत चिपळून भागातील 2000 कोकणवासीयांसाठी आवश्यक असलेल्या सर्व दैनंदिन वस्तूंच्या किटचे वाटप केले. कोकणवासीय बांधवांसाठी सलग तीन दिवस अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र या भागातील बाधित लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्या .

कोकणात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थिती मुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत करण्याचे कर्तव्य बजावण्याकरिता, राज्यात अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे आज कोकणावर ओढावलेली पारिस्थिती पहाता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपले कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवस न साजरा करता पूरग्रस्त भागात मदत करावी ह्या केलेल्या आवाहनानुसार पुणे शहरातील युवासेना पदाधिकाऱ्यांनी कोकणवासीय लोकांसाठी मदत जमा करण्यास सुरुवात केल्यानंतर मदत नव्हे कर्तव्ये या भावनेतून असंख्य पुणेकरांचा प्रतिसाद लाभला.

अधिक वाचा  ममतांचा मुंबई दौरा: मविआत धुसफूस, तर भाजपला पोषक; राजकारण वेगळ्या वळणावर?

यापुढील काळातही युवासेनेच्या मार्फत कोकणवासीय व दुर्घटनाग्रस्त आपत्तीग्रस्त लोकांना मदत करण्याचा संकल्प करण्यात  आला असून कोल्हापूर बीड जिल्ह्यातही या प्रकारेच कार्य करण्याचा संकल्प ह युवा सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या सुचनेनुसार, कोकणातील 2000 कुटुंबांन करिता, जीवनावश्यक अन्नधान्याच्या वस्तू, प्रमुख गरजू साहित्य, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित् इत्यादी वस्तूंचे स्वतंत्र 2000 संच (पॅकेट्स) केले.

28 जूलै रात्री 11.30 मिनिटांनी कोकण (चिपळूण) या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर पहाटे 6.30 मिनिटांनी चिपळूण मध्ये पोचल्यावर तेथे शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत साहेब, मा.आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख- सचिन कदम यांची भेट घेऊन पूरपरिस्थिती चा आढावा घेत मी शहरातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाधितांना आधार देण्यासाठी सांत्वन केले व खचू नका आम्ही बरोबर आहोत हा लढा आपण जिँकूच विश्वास देत बाधितांच्या खचलेल्या मनाला आधार देण्याचे काम केले.

अधिक वाचा  कमी गुंतवणूकीमध्ये दरमहिना 60 हजार रुपये कमवा, SBI चा धमाका

पर्यावरण मंत्री युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या सोबत पूर परिस्थितीची पाहणी केली. प्रसंगी तेथील नागरिकांना पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत साहेब, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, यांच्या हस्ते मदत सुपूर्त करण्यात आली. 2000 कुटुंबांना जीवनावश्यक अन्न-धान्याच्या वस्तू, 2000 ब्लॅंकेट, विद्यार्थ्यांकरिता शालेय साहित्य, 5000 ली मिनरल वॉटर 5000 लिटर जंतू-कीटकनाशक / सॅनिटायझर इत्यादी वस्तू स्थानिक लोकप्रतिनिधी कडे देऊन प्रत्यक्षात लोकांच्या सुख-दुःखात सहभागी झाल्याचे किरण साळी यांनी सांगितले.