कोल्हापूर : गाव म्हणून तुम्ही निर्णय घ्या. पुनर्वसन करायची जबाबदारी माझी. दरवर्षी आम्ही तुम्हाला भेटत राहणार, दरवर्षी सगळं वाहून जाणार ,तुम्ही असं बाहेर राहणार हे बरोबर नाही. हे असं आयुष्य नाही जगायचं. त्यावर पुनर्वसन हा एकमेव इलाज आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ पूरग्रस्त पाहणी दरम्यान केले‌.

यावेळी शिरोळ भागातील पूरग्रस्त महिलांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, पुनर्वसनाबरोबरच आम्हाला रोजगार ही पाहिजे. आमच्या गावात दिवसाला शंभर रुपये हजेरी आहे. तुम्ही जी मदत देणार आहात ती आम्हाला किती दिवस पुरणार? यासाठी कायमस्वरूपी यावर मार्ग काढावा, अशी विनंती शिरोळ भागातील पूरग्रस्त महिलांनी केली.

अधिक वाचा  शिवेंद्रराजेंच्या कार्यशैलीचे पवार साहेबांकडून कौतुक, सिल्व्हर ओकवर भेट

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरण संदर्भातही महिलांशी संवाद साधला. लसीकरण पूर्ण करून घ्या , मास्क वापरा. गावाच्या पुनर्वसनाची मागणी मार्गी लावू. गाव म्हणून तुम्ही ठरवा करा. निश्चितच तुमच्या मागणीचा विचार केला जाईल असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे व्यक्त केले.

नृसिंहवाडी, शिरोळ भागाची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री आता कोल्हापूरची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत. थोड्याच वेळात ते कोल्हापूर,शाहूपुरी, कुंभार गल्ली या ठिकाणी पोहोचतील. शिरोळ भागातील पूरग्रस्त महिलांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, पुनर्वसनाबरोबरच आम्हाला रोजगार ही पाहिजे.