हडपसर :  मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रावर नैसर्गिक आप्पती ओढावली आहे . काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे , महापूर येणे ह्यामुळे कोकण , कोल्हापूर , सांगली सातारा मराठवाडा ह्या भागातील जनजीवन पूर्णपणे विसकळीत तर झालेच आहे. अन्न , पाणी अश्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात भासू लागला आहे. प्रशासन आणि सरकार नागरिकांना मदत करत आहेच, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण देखील पूरग्रस्त बांधवाना मदत करावी.

“एक हात मदतीचा – पूरग्रस्तांसाठी शीदा माणुसकीचा ” ह्या प्रांजळ भावनेने प्रेरित होऊन वर्धमान टाउनशीप , ससाणे नगर हडपसर मधील रहिवाश्यांनी ज्याला जस जमेल तशी मदत केली आहे. ₹ वर्धमानचे चेअरमन  महेश किसन पवार ह्यांनी सोसायटीतील जेष्ठ नागरिक सेवा निवृत्त पोलीस अधिकारी मारुती फाळके , सेवा निवृत्त अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनातील तज्ञ्  चंद्रकांत मादुस्कर , रश्मी मादुस्कर , ह्यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकीचा शीदा उपक्रम राबविला.

अधिक वाचा  महायुतीचे एकमत हा फॉर्म्युला? भाजप सर्वाधिक जागी मित्रपक्ष भाजप कोट्यातून राष्ट्रवादीला 5 तर शिवसेनेला…

शीदा पाकिटे तयार करताना आलेल्या वस्तूंचे नियोजनबद्ध पद्धतीने एका कुटुंबाला कमीत कमी तीन दिवस पुरेल एव्हढया जीवनावश्यक गोष्टींची तरतूद करून ठेवली. असे करताना त्यांनी , पूरग्रस्त भागात वीज सुरळीत नाही ह्याचं भान ठेवून आलेल्या ज्वारी,गहू इ. धान्याचं पीठ करून त्याची पाकिटे बनवली. तसेच तांदूळ , डाळी , तिखट , मीठ , रवा , शेंगदाणे , बिस्किटे , तसेच साबण , तेल , शॅम्पू , टूथपेस्ट ह्या सारख्या वस्तूंची योग्य अधिक प्रमाणात पाकिटे करून त्याचा एक परिपूर्ण शीदा पाकिटे तयार केली आणि आज ती कै. अर्जुनराव बनकर प्रतिष्टान आणि शिवसेनेच्या हडपसर पदाधिकाऱ्यांच्या स्वाधिन केली.

अधिक वाचा  अनुराग कश्यपला 15 मिनिटांसाठी भेटायचं असेल तर द्यावे लागतील इतके रुपये; शेअर केली पोस्ट

ह्या उपक्रमात वर्धमान टाउनशिप मधील रहिवाशी , शांताराम मालुसरे , मारुती फाळके ,दीपेश बावकर , माधव घटे , बापू जाधव , श्द्कात मादुस्कर , रश्मी मादुस्कर, पुनम पवार ; वर्धमान मित्र मंडळतील ,विििशलल भोर , सुमंत लंगडे , श्री वैभव बाबर , श्री. गौरव यादव , श्री स्वप्नील भालेराव , अनिकेत मोरे ,आणि , वर्धमान सोशल परिवार तर्फे श्क्बाल तांबोळी , सागर वाणी, वैशाली भेंडे , श्झहर शेख , यांनी मोलाचे योगदान दिले .