पुणे: पुणेकरांसाठी एक चांगली बातमी आहे. पुणे मेट्रोची आज सकाळी ७ वाजता ट्रायल रन पार पडली. पालकमंत्री अजित पवार आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत ट्रायल रन झाली. कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ३ किलोमीटरचा टप्पा तयार आहे.

पीएमसी क्षेत्रातील वनाज-रामवाडी मार्गिकेतील, वनाज-आयडीयल कॉलनी मार्गावरील पुणेमेट्रोच्या प्रथम ‘ट्रायल रन’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला व पुणे मेट्रो कोचच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले.

१० जुलैला वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यान पुणे मेट्रोची तांत्रिक चाचणी झाली होती. “शुक्रवारच्या ट्रायल रनसाठी आम्ही तयार आहोत. यासंबंधीची सविस्तर माहिती नंतर देऊ” असे पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्याने काल सांगितले. यापूवी पुणे मेट्रोची पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान ६ किमीच्या पट्टयात ट्रायल रन घेण्यात आली होती.

अधिक वाचा  ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

उर्वरित पट्टयाचे काम प्रगतीपथावर आहे. शिवाजीनगर ते बुधवार पेठ दरम्यान जमिनीखालून बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. कोरोना काळातील लॉकडाउनचा पुणे मेट्रोच्या कामाला फटका बसला होता. त्यामुळे प्रकल्पाची मुदत वाढवण्यात आली आहे.